दीपिका-सौरव जोडीने जिंकले कांस्य! दिनेश कार्तिकने खास अंदाजात केले पत्नीचे अभिनंदन

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताच्या स्टार स्क्वॉश जोडीने कांस्य पदक जिंकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:23 IST2022-08-08T13:21:41+5:302022-08-08T13:23:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Dinesh Karthik congratulated his wife Deepika Pallikal for winning the bronze medal | दीपिका-सौरव जोडीने जिंकले कांस्य! दिनेश कार्तिकने खास अंदाजात केले पत्नीचे अभिनंदन

दीपिका-सौरव जोडीने जिंकले कांस्य! दिनेश कार्तिकने खास अंदाजात केले पत्नीचे अभिनंदन

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) मध्ये भारताच्या स्टार स्क्वॉश जोडीने कांस्य पदक जिंकले आहे. दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल (Dipika Pallikal Saurav Ghosal)या जोडीने स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत पदक पटकावले. दीपिकाच्या या विजयाचे तिचा पती दिनेश कार्तिकने ट्विट करून अभिनंदन केले आहे. कार्तिकने खास अंदाजात अभिनंदन केल्याने त्याचे ट्विट खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

जेव्हा दीपिका पल्लीकल भारतासाठी खेळत होती तेव्हा दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघासोबत अमेरिकेला होता. कार्तिकने आपल्या पत्नीचे अभिनंदन करताना लिहले, "मला तुमच्या दोघांचाही अभिमान आहे", पत्नीला अशा साध्या पद्धतीने शुभेच्छा देणे चाहत्यांना खूप भुरळ घालत आहे. 

"शेवटी हे झालंच! तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाले. तुमच्या दोघांचाही मला अभिमान आहे आणि मला खूप आनंद झाला आहे", अशा आशयाचे ट्विट करून कार्तिकने आपल्या पत्नीचे विशेष अभिनंदन केले. या ट्विटला अनेक कमेंट्स येत असून दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
दीपिका-कार्तिक जोडीने दिले विजयाचे गिफ्ट 
रविवारच्या दिवशी दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल दोघेही भारताचे प्रतिनिधित्व करत होते. तसेच दोघांनीही तमाम भारतीयांना विजयाचे गिफ्ट दिले आहे. दीपिकाने स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे आणि भारतीय संघाने देखील वेस्टइंडिजवर ४-१ ने विजय मिळवून मालिकेवर कब्जा केला आहे. दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या जोडीने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले होते. तर सौरव घोषालने पुरूष स्क्वॉश एकेरीच्या सामन्यात कांस्य पदक पटकावले होते. स्क्वॉश एकेरीमध्ये पहिल्यांदाच कोणत्या भारतीय खेळाडूने पदक जिंकले आहे.  

 

Web Title: Dinesh Karthik congratulated his wife Deepika Pallikal for winning the bronze medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.