पंजाबमध्ये शुबमन गिलसोबत करायचा नेट प्रॅक्टिस! २० दिवसांसाठी दुबईला गेला अन् तो UAE चा झाला

 २० दिवसाच्या कॅम्पसाठी दुबईला गेला अन् तो झाला UAE क्रिकेट संघाचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 22:38 IST2025-09-10T19:46:29+5:302025-09-10T22:38:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Did You Know Simranjeet Singh Bowled To 12 Year Old Shubman Gill And Now He Play Against Him For UAE | पंजाबमध्ये शुबमन गिलसोबत करायचा नेट प्रॅक्टिस! २० दिवसांसाठी दुबईला गेला अन् तो UAE चा झाला

पंजाबमध्ये शुबमन गिलसोबत करायचा नेट प्रॅक्टिस! २० दिवसांसाठी दुबईला गेला अन् तो UAE चा झाला

भारतीय क्रिकेट संघ यूएई विरुद्धच्या लढतीनं आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. UAE च्या तुलनेत भारतीय संघ खूपच मजबूत आहे. त्यामुळे ही मॅच एकतर्फीच होईल. पण या सामन्याआधी UAE चा एक गोलंदाज चर्चेत आलाय कारण त्याचे कारण तो मूळचा भारतातील पंजाबमधील आहे. एवढेच नाही तर क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळी १२ वर्षांच्या गिलला त्याने नेटमध्ये गोलंदाजी केलीये. कोण आहे हा गोलंदाज जो आता अनेक वर्षांनी शुबमन गिलला प्रतिस्पर्धी रुपात भिडणार आहे? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पंजाबी वर्सेस पंजाबी

भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार शुबमन गिलला वयाच्या १२ वर्षी पंजाब क्रिकेट अकादमीत नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करायचा तो आता UAE च्या संघाकडून भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. UAE च्या ताफ्यातील या गोलंदाजाचे नाव सिमरनजीत सिंग असं आहे. ऐकेकाळी  पंजाबमधील मोहालीच्या PCA अकादमीत एकमेकांविरुद्ध उतरणारे दोन पंजाबी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संघाचे प्रतिनीधीत्व करताना दिसतील.

रुमाल पडला; बॅटर क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं ठरवलं Not Out

तो मला ओळखतो की नाही माहिती नाही, पण... 

पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत समिरनजीत सिंग याने शुबमन गिलसंदर्भातील खास गोष्ट शेअर केलीये.  तो म्हणाला की, २०११-१२ मध्ये शुबमन गिल ज्यावेळी  जवळपास १२ वर्षांचा होता त्यावेळी तो वडिलांसोबत सकाळी सरावासाठी मैदानात यायचा. आम्ही सकाली ६ ते ११ या वेळेत नेट प्रॅक्टिस करायचो. त्यावेळी मी गिलला गोलंदाजी करायचो. आजही त्याला हेआठवते का? तो मला ओळखेल का? ते माहिती नाही. पण मी त्याला लहानपणापासून ओळखतो, असे यूएईच्या गोलंदाजाने म्हटले आहे.

 २० दिवसाच्या कॅम्पसाठी दुबईला गेला अन् तो झाला UAE क्रिकेट संघाचा चेहरा

३५ वर्षीय  सिमरनजीत सिंग हा फक्त अन् फक्त क्रिकेट करिअरचा विचार करून देश सोडणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. आपला निर्णय सार्थ ठरवत तो आता UAE संघाचा प्रमुख खेळाडू बनलाय. पंजाबमधील जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये छाप सोडल्यावर २०१७ मध्ये त्याचे रणजी संघातील संभाव्य खेळाडूंच्या यादीत नाव होते. याशिवाय त्याने प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या किंग्स इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्स) संघाचा तो नेट बॉलरही राहिलाय. २०२१ मध्ये कोरोनातील लॉकडाउन काळात या क्रिकेटरच्या करिअरला कलाटणी मिळाली. प्रॅक्टिस कॅम्पसाठी २० दिवसांसाठी तो दुबईला गेला होता. पण लॉकडाउनमधील त्याचा मुक्काम वाढला. तिथं क्रिकेटमध्ये रमला अन्  UAE संघाकडून खेळण्यास पात्र होताच त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली. 
 

Web Title: Did You Know Simranjeet Singh Bowled To 12 Year Old Shubman Gill And Now He Play Against Him For UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.