Rohit Sharma And Shubman Gill Stats In SENA Countries : भारतीय फलंदाजांसाठी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या चार देशात कसोटी सामना हे खेळणं खूप आव्हानात्मक असते. मोजक्या फलंदाजांनी या कठीण परिस्थितीत आपल्या भात्यातून दमदार खेळीसह विशेष छाप सोडल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण मॉडर्न जमान्यातील स्टार बॅटर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालसह भारतीय कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माचा सेना देशातील रेकॉर्ड हा खूपच खराब राहिला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वरपेक्षाही या स्टार फलंदाजांची कामगिरी ढिसाळ राहिली आहे.
SENA देशांत रोहितची सरासरी भुवनेश्वर कुमार पेक्षाही कमी
भुवनेश्वर कुमारनं SENA देशांत ८ कसोटी सामन्यातील १६ डावात ३०.६१ च्या सरासरीनं ३९८ धावा काढल्या आहेत. यात भुवनेश्वरनं केलेल्या नाबाद 63 धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्याच्या खात्यात सेना देशांत खेळताना तीन अर्धशतकांचीही नोंद आहे. एक गोलंदाज असून त्याने बॅटिंगमध्ये दाखवलेली धमक खासच ठरते. पण रोहितला एक फलंदाज असून या गोलंदाजासारखी छाप सोडता आलेली नाही.
रोहितची सेना देशांतील कामगिरी
भारतीय कर्णधार रोहित शर्मानं SENA देशांत आतापर्यंत खेळलेल्या २२ कसोटी सामन्यात २९.७ च्या सरासरीनं ४३ डावात ११३४ धावा काढल्या आहेत. त्याच्या भात्यातून सेना देशांत एक शतक आणि सहा अर्शशतके पाहायला मिळाली आहेत.
शुभमन गिल आणि यशसवी जैस्यवालची कामगिरी
भारतीय कसोटी संघात स्थान निश्तिच करणाऱ्या युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं सेना देशांत आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २६.५५ च्या सरासरीनं फक्त २२९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या भात्यातून १६१ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. ही त्याची सेना देशातील सर्वोच्च धावसंख्या आहे. सेना देशात त्याने ५० पेक्षा अधिक धावांची केलेली ही एकमेव खेळी आहे. शुबमन गिलनं दोन अर्धशतकासह १५ डावात सेना देशांत ४१४ धावा केल्या असून त्याची सरासरी २९.५७ अशी आहे.