Dhanashree Verma Yuzvendra Chahal Divorce Gossips: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी प्रसिद्ध यूट्युबर व कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. कोरोना काळात या दोघांचे प्रेम जुळले. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये युजी - धनश्री यांनी लग्नगाठ बांधली. धनश्री - युजी यांची जोडी सुरुवातीपासूनच चर्चेत असायची. धनश्री युजीसोबत कायम दिसायची. पण गेल्या दीड-दोन वर्षांपासून अचानक धनश्री आणि युजवेंद्र यांच्यात दुरावा आल्याचे दिसत आहे. पायाच्या दुखापतीमुळे धनश्री विश्रांती घेतेय असे काही वेळा सांगण्यात आले. पण यंदाच्या २२ डिसेंबरला या दोघांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली. तरीही सोशल मीडियावर नेहमी अँक्टिव्ह असणाऱ्या या दोघांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कुठलीच पोस्ट केली नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले. तशातच धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केली. त्यानंतर युजवेंद्र चहलनेइन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली.
युजवेंद्र चहल गेल्या काही काळापासून भारतीय संघाचा भाग नाही. पण तरीही धनश्री वर्मासोबतच्या नात्यामुळे तो चर्चेत असतो. त्याच्या सोशल मीडियावर फॅन्स लक्ष ठेवून असतात. २२ डिसेंबरला लग्नाच्या वाढदिवशी दोघांनीही एकही पोस्ट किंवा स्टोरी टाकली नव्हती. पण त्यानंतर दोघे फारच अँक्टिव्ह झाले आहेत. धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर काल एक व्हिडीओ पोस्ट केली. त्यात ती एका गायकासोबत गाताना दिसत आहे.
या व्हिडीओवर युजवेंद्र चहलने कमेंट केलेली नाही. पण त्याने आज (शनिवारी, २८ डिसेंबर) एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात त्याने बजरंगबलीचा फोटो पोस्ट केला आहे. त्याखालील वाक्य खूपच बोलकं आहे. त्या फोटोखाली लिहिलं आहे की, काहींना भीती असते की देव सगळं काही पाहतोय. पण काहींना दिलासा आणि विश्वास असतो की देव सगळं पाहतोय.
दरम्यान, या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचे नेमके कारण काय, याची कल्पना नाही. दोघांपैकी कुणीही नात्यातील दुराव्याबाबत अधिकृत भाष्यदेखील केलेले नाही. पण काही महिन्यांपूर्वी धनश्री वर्माचे नाव मुंबईकर क्रिकेटर श्रेयस अय्यर सोबत जोडण्यात आले होते. तसेच धनश्रीचा एका पार्टीत एका मित्रासोबत घट्ट मिठी मारलेला फोटोही चाहत्यांना रूचला नव्हता. अशातच आता घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले असताना चाहते धनश्रीवर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत.