डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर अडवले, बॉडी स्कॅनमध्ये दिसली संशयास्पद गोष्ट, त्यानंतर...

David Warner: डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर रोखले. त्यानंतर वॉर्नरचं बॉडी स्कॅनिंग करण्यात आलं. या स्कॅनिंगमध्ये काही संशयास्पद दिसल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्नला विमानात जाऊ देण्यात आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:29 PM2023-08-31T13:29:53+5:302023-08-31T13:30:53+5:30

whatsapp join usJoin us
David Warner stopped at airport by police, body scan shows something suspicious, then... | डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर अडवले, बॉडी स्कॅनमध्ये दिसली संशयास्पद गोष्ट, त्यानंतर...

डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर अडवले, बॉडी स्कॅनमध्ये दिसली संशयास्पद गोष्ट, त्यानंतर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये सध्या तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला भलत्याच अडचणींचा सामना करावा लागला. डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर रोखले. त्यानंतर वॉर्नरचं बॉडी स्कॅनिंग करण्यात आलं. या स्कॅनिंगमध्ये काही संशयास्पद दिसल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्नला विमानात जाऊ देण्यात आलं. या घटनेची माहिती डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने दिली आहे.

अमेरिकेच्या लॉस एंजिल्स विमानतळावर डेव्हिड वॉर्नरसोबत घडलेल्या घटनेची सध्या चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वॉर्नरला लॉस एंजिल्स विमानतळावर सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आले. तपासणीदरम्यान, स्कॅनर मशीनने डेव्हिड वॉर्नरच्या प्रायव्हेट पार्टकडे काही इशारा केला. त्यामुळे वॉर्नरला तपासणीच्या फेऱ्यात अडकावं लागलं.

वॉर्नरची पत्नी कँडिस हिने ऑस्ट्रेलियातील रेडिओ चॅनल ट्रिपल एमशी बोलताना सांगितले की, वॉर्नर तिथून जात असताना बीप वाजू लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला फुल बॉडी स्कॅनरजवळ नेण्यात आले. तिथे वॉर्नरने हात वर केल्यावर पुन्हा बीप वाजू लागली.

कँडिसने सांगितले की, वॉर्नरच्या प्रायव्हेट पार्टवर संगणक हॉटस्पॉट दिसत होता. आजूबाजूचे सगळे लोक हसत होते. वॉर्नरने पियर्सिंग केलेली असावी, अशी एका व्यक्तीला शंका होती. कदाचित त्यामुळेच मशीनमधून असा आवाज येत होता. मात्र अखेरीस वॉर्नरला फ्लाइटमध्ये जाण्यासाठी मान्यता देण्यात आली. 

Web Title: David Warner stopped at airport by police, body scan shows something suspicious, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.