Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)

DC विरुद्धच्या सामन्यात २७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग याने स्वप्नवत पदार्पण केले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 23:04 IST

Open in App

CSK Pacer Gurjapneet Singh Takes Wicket On First Ball Of His First Ever IPL Match : आयपीएल २०२६ च्या हंगामातील पराभवाच्या हॅटट्रिकनंतर चेपॉकच्या घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दमदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीत संजू सॅमसनच्या विक्रमी शतकासह आयुष म्हात्रेनं केलेल्या कडक अर्धशतकानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनीही संघाला दमदार सुरुवात करून देत दिल्ली कॅपिटल्सला धक्क्यावर धक्के दिले. या सामन्यात  २७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग याने स्वप्नवत पदार्पण केले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट, सरफराजचा अफलातून झेल  

CSK च्या संघाकडून DC विरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात गुरजपनीत सिंग याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा डाव साधला. 'जॉन्टी ऱ्हॉड्स'च्या तोऱ्यात सरफराज खान याने दिल्लीकर कर्णधार अक्षर पटेलचा अफलातून झेल टिपत गुरजपनीत सिंगला पहिली विकेट मिळवून देण्यात हातभार लावला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल फक्त २ चेंडूत १ धाव करून बाद झाला आणि या विकेटमुळे गुरजपनीत सिंग एका खास यादीत सामील झाला.  

Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक

आयपीएलच्या इतिहासात इशांत शर्मानं पहिल्यांदा साधला होता हा डाव 

इशांत शर्मा हा IPL इतिहासात आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. पहिल्याच हंगामात १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरूच्या मैदानात त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध हा पराक्रम केला होता. या यादीत आता चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या गुरजपनीत सिंगचा समावेश झाला आहे. १९ व्या हंगामात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो १७ वा गोलंदाज ठरला.  IPL पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज

  • इशांत शर्मा – २००८
  • विल्किन मोटा – २००८
  • एस विद्युत – २००८
  • रवी तेजा – २००८
  • शेन हारवुड – २००९
  • अमित सिंग – २००९
  • चार्ल लॅंगव्हेल्ट – २००९
  • केविन पीटरसन – २००९
  • अली मुर्तजा – २०१०
  • टीपी सुधींद्र – २०१२
  • ॲडम गिलख्रिस्ट – २०१३
  • हनुमा विहारी – २०१३
  • अल्झारी जोसेफ – २०१९
  • डेवाल्ड ब्रेविस – २०२२
  • मथीशा पथिराना – २०२२
  • अश्वनी कुमार – २०२५
  • गुरजपनीत सिंग – २०२६
English
हिंदी सारांश
Web Title : Gurjapneet Singh's dream debut; Sarfaraz's stunning catch in CSK vs DC!

Web Summary : Gurjapneet Singh debuted with a wicket on his first ball for CSK against DC. Sarfaraz Khan took a brilliant catch, contributing to Delhi's early setbacks. Singh joins an elite list, mirroring Ishant Sharma's feat. He is the 17th bowler to achieve this in IPL history.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्ससंजू सॅमसनआयुष म्हात्रेऋतुराज गायकवाडसर्फराज खान