Join us

IPL 2020 CSK : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या सामन्यालाही मुकणार 

IPL 2020 : ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू शकला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 17:34 IST

Open in App

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ( CSK) आयपीएलच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वाची दणक्यात सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी आणि गतविजेते मुंबई इंडियन्सला ( MI) ५ विकेट्सनी  नमवले. खरं म्हणजे या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण लसिथ मलिंगा ( Lasith Malinga) खेळणार नसला, तरी मुंबईकर पूर्ण ताकदीने या सामन्यात उतरणार होते. त्याचवेळी, चेन्नई सुपरकिंग्ज संघ मात्र आपल्या काही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थित मैदानावर उतरला होता. 

संजय मांजरेकरने ओढावला नवा वाद; अंबाती रायुडू, पीयूष चावला यांना म्हणाला 'Low Profile' क्रिकेटपटू

प्रतिकूल परिस्थितीमध्येही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त दबाव न घेता अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डूप्लेसिस ( Faf Du Plessis) या अनुभवी फलंदाजांनी संयमी खेळला आक्रमणाचा जोड देत चेन्नईला शानदार विजय साकारला. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला होता. एकीकडे मुंबईकर हुकमी वेगवान गोलंदाज मलिंगाच्या अनुपस्थित मैदानावर उतरणार होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून मलिंगाची ओळख आहे. दुसरीकडे, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी आधीच आयपीएलमधून माघार घेतली असल्याने, ते खेळणार नसल्याचे स्पष्ट होते. परंतु, स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू शकला नव्हता.

कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

आता, ब्रावो दुसऱ्या सामन्यासह आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांतही खेळणार नसल्याचे खुद्द चेन्नईचे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा चेन्नईसाठी एक धक्काच मानला जात आहे. ब्रावोच्या जागी चेन्नईने अष्टपैलू सॅम कुरेनला अंतिम संघात स्थान दिले आणि त्याने नियंत्रित गोलंदाजीसह, मोक्याच्यावेळी आक्रमक फटकेबाजी करत चेन्नईच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

दिल्ली-पंजाब सामन्यात तीन मोठे विक्रम मोडणार; सुरेश रैनाला धक्का बसणार

मुंबईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, ‘ड्वेन ब्रावो आणखी काही सामन्यांसाठी संघाबाहेर राहील. तो संघासाठी महत्त्वाचा आहे, पण अद्याप तो दुखापतीतून सावरलेला नाही.’ नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धेत ब्रावोला दुखापत झाली होती. गुढघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो अंतिम सामन्यातही खेळू शकला नव्हता.

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ब्राव्होनं केला होता विक्रम

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यानं 459 सामन्यांत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. लसिथ मलिंगा 390 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

500 विकेट्स घेण्याचा पहिला मान प्रथम श्रेणी - विलियम लिलीव्हाईट ( 1837)लिस्ट ए - जॉन लेव्हर ( 1983) कसोटी - कर्टनी वॉल्श ( 2001)वन डे - वसीम अक्रम ( 2003)ट्वेंटी-20 - ड्वेन ब्राव्हो ( 2020) 

टॅग्स :आयपीएल 2020ड्वेन ब्राव्होचेन्नई सुपर किंग्स