IPL 2020 DC vs KXIP Latest News: दिल्ली-पंजाब सामन्यात तीन मोठे विक्रम मोडणार; सुरेश रैनाला धक्का बसणार

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभव पत्करावा लागला.

चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला.

आज IPL 2020तील दुसरा सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) हा सामना खेळला जाणार आहे.

दोन्ही संघांत तगडे खेळाडू आहेत. ख्रिस गेल, शिखऱ धवन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस यांची फटकेबाजी पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आजच्या सामन्यात तीन विक्रम तुटण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनला आजच्या सामन्यात सुरेश रैनाच्या एका विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. धवनने 159 IPL सामन्यांत 37 अर्धशतकं झळकावली आहेत आणि आज त्यानं अर्धशतक केल्यास तो सुरेश रैनाच्या 38 अर्धशतकांचा विक्रमाशी बरोबरी करेल. IPLमध्ये सर्वाधिक फिफ्टीचा विक्रम रैनाच्या नावावर आहे.

IPLमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) च्या नावावर आहे. त्यानं 2018मध्ये 14 चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं. रिषभ पंतनेही ( Rishab Pant) 18 चेंडूंत अर्धशतक झळकावले आहे. आजच्या सामन्यात पंतला हाही विक्रम नावावर करण्याची संधी आहे.