IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

IPL 2020 DC vs KXIP Latest News: अजिंक्य रहाणेला मिळेल का संधी?

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 04:05 PM2020-09-20T16:05:23+5:302020-09-20T16:50:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 DC vs KXIP Latest News: Delhi Capitals vs Kings XI Punjab: A look at likely playing XIs of both teams | IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे2019च्या IPLमध्ये DCने 7 मोसमानंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होताKXIP संघाला 2014नंतर एकदाही टॉप फोरमध्ये स्थान पटकावता आलेलं नाही. Head To Head - एकूण सामने 24, पंजाब विजयी - 14, दिल्ली विजयी -10

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. आज IPL 2020तील दुसरा सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना होणार आहे.  ( IPL 2020 Live Updates, Click here

IPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य!

2019च्या IPLमध्ये DCने 7 मोसमानंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता, तर KXIP संघाला 2014नंतर एकदाही टॉप फोरमध्ये स्थान पटकावता आलेलं नाही. दोन्ही संघांत काही नवे चेहरे दिसणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (DC) च्या ताफ्यात शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) आणि मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) हे दोन तगडे फलंदाज दाखल झाले आहेत. शिवाय त्यांनी आर अश्विन ( R Ashwin) व अजिंक्य रहाणे  ( Ajinkya Rahane) यांना ट्रेडवर आपल्या चमूत दाखल करून घेतले. त्यांचा अनुभव DCच्या कामी येईल.  ( IPL 2020 Live Updates, Click here

MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) यांच्याही संघात नवे चेहरे दिसणार आहेत. IPL 2020 Auctionमध्ये त्यांनी ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) आणि शेल्डन कोट्रेल ( Sheldon Cottrell) यांच्यासाठी मोठी रक्कम मोजली.  अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन KXIP संघाला मिळणार आहे.   ( IPL 2020 Live Updates, Click here

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) ने IPL Auction 2020 त करारबद्ध केलेले खेळाडू 
जेसन रॉय - 1.50 कोटी , ख्रिस वोक्स - 1.50 कोटी, अ‍ॅलेक्स केरी - 2.40 कोटी, सिमरोन हेटमायर - 7.75 कोटी, मोहित शर्मा - 50 लाख, तुषाप देशपांडे - 20 लाख, मार्कस स्टॉयनिस - 4.80 कोटी, ललित यादव - 20 लाख  

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य संघ ( Delhi Capitals likely playing XI ) - शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, श्रेयस अय्यर ( कर्णधार) , रिषभ पंत, किमो पॉल, मार्कस स्टॉयनिस, अमित मिश्रा, आर अश्विन, कागिसो रबाडा, इशांत शर्मा 

किंग्स इलेव्हन पंजाब ( दिल्ली कॅपिटल्स ) ने IPL Auction 2020 त करारबद्ध केलेले खेळाडू 
ग्लेन मॅक्सवेल - 10.75 कोटी, शेल्डन कोट्रेल - 8.50 कोटी, दीपक हूडा - 50 लाख, इशान पोरेल - 20 लाख, रवी बिश्नोई - 2 कोटी, ख्रिस जॉर्डन - 3 कोटी, तजींदर ढिल्लोन - 30 लाख, सिम्रन सिंग - 55 लाख

किंग्स इलेव्हन पंजाब संभाव्य संघ ( Kings XI Punjab likely playing XI) - लोकेश राहुल ( कर्णधार), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पुरन, कृष्णप्पा गोवथम, रवी बिश्नोई, दीपक हुडा, शेल्डन कोट्रेल, मोहम्मद शमी, इशान पोरेल. 

Web Title: IPL 2020 DC vs KXIP Latest News: Delhi Capitals vs Kings XI Punjab: A look at likely playing XIs of both teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.