Cricket Australia Test Playing XI : ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं २०२५ च्या वर्षभरातील कामगिरीच्या जोरावर सर्वोत्तम ११ खेळाडूंचा कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात तीन भारतीयांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे युवा बॅटर यशस्वी जैस्वालसह वर्ष गाजवणारा मोहम्मद सिराज या संघात दिसत नाही. चौथ्या भारतीयाच्या रुपात स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाला १२ व्या खेळाडूच्या रुपात पसंती देण्यात आली आहे. इथं एक नजर टाकुयात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणकोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अपराजित कॅप्टन टेम्बा बावुमाचा रुबाब!
यंदाच्या वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. ICC WTC Final मध्ये टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चांदीची गदा उंचावली होती. टेम्बा बावुमानं या स्पर्धेतील कामगिरीसह एकही कसोटी सामना न गमावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्याला वर्षातील बेस्ट टेस्ट टीमचा कॅप्टन निवडण्यात आले आहे.
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
कोणत्या भारतीय खेळाडूंची लागली वर्णी?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीराच्या रुपात लोकेश राहुलला पसंती देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात लोकेश राहुलनं कसोटी क्रिकेटमध्ये खास छाप सोडली होती. भारतीय कसोटी कर्णधाराच्या रुपात नव्या इनिंगची सुरुवात करणारा शुभमन गिल याला चौथ्या क्रमांकावरील आश्वासक फलंदाजाच्या रुपात निवडण्यात आले असून जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. चौथ्या भारतीयाच्या रुपात रवींद्र जडेजा १२ वा खेळाडू आहे.
Cricket Australia ने निवडलेली २०२५ या वर्षातील बेस्ट प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल, ट्रॅविस हेड, जो रूट, शुभमन गिल, टेम्बा बावुमा (कर्णधार), बेन स्टोक्स, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, स्कॉट बोलंड, सायमन हार्मर, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू)
Web Summary : Cricket Australia's 2025 Test XI features three Indians: KL Rahul, Shubman Gill, and Jasprit Bumrah. Ravindra Jadeja is the 12th man. Temba Bavuma leads as captain after South Africa's successful year.
Web Summary : क्रिकेट ऑस्ट्रेलिया की 2025 टेस्ट XI में तीन भारतीय: केएल राहुल, शुभमन गिल और जसप्रीत बुमराह शामिल हैं। रवींद्र जडेजा 12वें खिलाड़ी हैं। दक्षिण अफ्रीका के सफल वर्ष के बाद टेम्बा बावुमा कप्तान हैं।