कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) आजच्या सामन्यात सेंट ल्युसीआ झौक्स संघानं प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाविरुद्ध 20 षटकांत 6 बाद 172 धावा चोपल्या. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एक पराक्रम नावावर केला. आंद्रे फ्लेचर, मार्क डेयाल, नजीबुल्लाह झाद्रान आणि नबी यांनी पॅट्रीओट्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली.
होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना
फ्लेचर आणि रहकिम कोर्नवॉल यांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावा चोपताना झौक्स संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानं डेयाल आणि झाद्रान यांनी फ्लेचरला तोडीसतोड साथ दिली. फ्लेचरनं 33 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 46 धावा केल्या. डेयालनं 17 चेंडूंत 3 उत्तुंग षटकार खेचून 30 धावा, तर झाद्राननं 24 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 28 धावा केल्या. सोहेल तन्वीर आणि जॉन-रस जॅग्गेसर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन झौक्सच्या धावगतीला ब्रेक लावला. पण, नबीनं 22 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 35 धावांची खेळी केली. या खेळीसह त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा पल्लाही पार केला.
92 वर्षांत इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम झॅक क्रॅवलीनं केला!
शाब्बास झॅक; इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजानं मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी
IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन
Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला