होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

मैदानाबाहेर निवृत्त होणार धोनी हा पहिलाच दिग्गज क्रिकेटपटू नाही, ही यादी खूप मोठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 05:49 PM2020-08-22T17:49:12+5:302020-08-22T18:03:26+5:30

whatsapp join usJoin us
How about a charity cum farewell game from a team consisting of retired players vs the current Indian team?, ask Irfan Pathan  | होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी 15 ऑगस्टला निवृत्ती जाहीर केलीमाजी कर्णधार धोनीसाठी निवृत्तीचा सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे. धोनीनं भारताला आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा ( वन डे वर्ल्ड  कप, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकून दिल्या. आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. शिवाय त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे धोनीची निवृत्ती ही मैदानावरच व्हाही अशी अनेकांची इच्छा आहे. पण, मैदानाबाहेर निवृत्त होणार धोनी हा पहिलाच दिग्गज क्रिकेटपटू नाही, ही यादी खूप मोठी आहे. त्यामुळे धोनीच्या निमित्तानं माजी अष्टपैलू इरफान पठाणनं एक भन्नाट कल्पना सूचवली आहे.

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

महेंद्रसिंग धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. पण, त्याची निवृत्ती मैदानाबाहेर झाल्याने चाहते निराश आहेत.

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?

धोनीपूर्वी राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, व्ही व्ही एस लक्ष्मण आदी खेळाडूंना निरोपाचा सामना खेळता आला नाही. अशा खेळाडूंसाठी निरोपाचा कम चॅरिटी सामना आयोजित करण्याची कल्पना पठाणने सूचवली आहे. निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंचा संघ विरूध्द सध्याचा भारतीय संघ असा सामना आयोजित करावा अशी कल्पना पठाणने मांडली आहे.

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

इरफान पठाणचा संघ
गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, सुरेश रैना, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, इरफान पठाण, झहीर खान, अजित आगरकर, प्रग्यान ओझा

Web Title: How about a charity cum farewell game from a team consisting of retired players vs the current Indian team?, ask Irfan Pathan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.