England vs Pakistan, 3rd Test: शाब्बास झॅक; इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजानं मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम 

England vs Pakistan, 3rd Test: . पहिल्या दिवसाचा खेळ गाजवल्यानंतर झॅकने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 07:51 PM2020-08-22T19:51:49+5:302020-08-22T20:00:05+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan, 3rd Test: Zak Crawley is the 3rd youngest player to score a Test double century for england  | England vs Pakistan, 3rd Test: शाब्बास झॅक; इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजानं मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम 

England vs Pakistan, 3rd Test: शाब्बास झॅक; इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजानं मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan, 3rd Test: मालिकेत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघानं तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर झॅक क्रॅवली आणि जोस बटलर यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे उपटली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी दोनशेहून अधिक धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ गाजवल्यानंतर झॅकने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केलं. त्यानं 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. 

कर्णधार जो रूट ( 29) आणि ओली पोप ( 3) यांनाही छाप पाडता आली नाही. झॅक आणि बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला. झॅक 309 चेंडूंत 21 चौकारांच्या मदतीनं 182 धावांवर खेळत आहे. बटलरनं 199 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह 107 धावा केल्या आहेत. 99 धावांवर असताना मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर पचांनी त्याला झेलबाद दिले. पण, बटलरनं लगेच DRS घेतला आणि पंचांचा निर्णय चूकीचा ठरला. पुढच्याच चेंडूवर बटलरनं शतकी धाव घेतली. 

बटलरच्या शतकानंतर झॅक अॅक्शन मोडमध्ये आला. त्यानं 335 चेंडूंत द्विशतक पूर्ण केलं. त्यात 26 चौकारांचा समावेश आहे. इंग्लंडकडून द्विशतक झळकावणारा तो तिसरा युवा फलंदाज ठरला. त्यानं 22 वर्ष  201 दिवसांत ही कामगिरी केली. यासह त्यानं 1938/39 साली बिल एडरीच यांचा ( 22 वर्ष व 352 दिवस)  विक्रम मोडला. या विक्रमात पहिल्या दोन स्थानी लेन हटन ( 22 वर्ष व 60 दिवस) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1938मध्ये 364 धावा, तर डेव्हीड गोवर ( 22 वर्ष व 103 दिवस ) यांनी भारताविरुद्ध 1979मध्ये नाबाद 200 केल्या होत्या.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?

 99वर असताना पंचांनी दिलं बाद, तरीही जोस बटलरनं झळकावलं शतक; पाहा नेमकं काय घडलं


 

Web Title: England vs Pakistan, 3rd Test: Zak Crawley is the 3rd youngest player to score a Test double century for england 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.