Shane Warne: कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू? दीड वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

Shane Warne: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉन याच्या अकाली मृत्युमुळे क्रिकेट जगताला धक्का बसला होता. दरम्यान, शेन वॉर्नचा अचानक झालेला मृत्यू हा आजही चर्चेचा विषय ठरलेला असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:13 AM2023-06-22T11:13:45+5:302023-06-22T11:15:22+5:30

whatsapp join usJoin us
Corona vaccine took Shane Warne's life, shocking information came out | Shane Warne: कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू? दीड वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

Shane Warne: कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू? दीड वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉन याच्या अकाली मृत्युमुळे क्रिकेट जगताला धक्का बसला होता. दरम्यान, शेन वॉर्नचा अचानक झालेला मृत्यू हा आजही चर्चेचा विषय ठरलेला असतो. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंड येथे गेला असताना मार्च २०२२ मध्ये शेन वॉर्नचामृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. दरम्यान, आता शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, कोरोनावरील लसीमुळे वॉर्नचा मृत्यू झाल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी वॉर्नच्या मृत्यूचं कारण हे कोरोनावरील लस असू शकते, असं म्हटलं आहे. वॉर्नने कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. त्या लसीमुळे हृदयासंबंधी आजारांमध्ये वाढ होते. शेन वॉर्नचाही मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. मृत्यूपूर्वी ९ महिने आधी शेन वॉर्नने कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती.

शेन वॉर्नने mRNA ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. रिपोर्टनुसार ही अशी लस आहे, ज्यामुळे हृदयासंबंधीचे आजार वाढतात. ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि ब्रिटिश हृदयरोग तज्ज्ञांच्या मते शेन वॉर्नच्या मृत्यूमागचं कारण कोरोना लस असू शकते. एवढंच नाही तर कार्डियोलॉजिस्ट डॉ. ख्रिस नील आणि डॉ. असीम मल्होत्रा यांच्या मते वॉर्नने जी कोरोनावरील लस घेतली होती.  त्यामुळे कोरोनरी डिजीज वेगाने वाढू शकतात.

शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामने खेळले होते. कसोटीत त्याने ७०८ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २९३ विकेट्स घेतले आहेत. त्याशिवाय आयपीएलमध्ये खेळलेल्या ५५ सामन्यात त्याने ५७ विकेट्स टिपल्या होत्या.  

Web Title: Corona vaccine took Shane Warne's life, shocking information came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.