Join us  

CoronaVirus: आयपीएल होणार रद्द?; उद्धव ठाकरेंनी केलं मोठं विधान

कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 9:12 PM

Open in App

मुंबई: चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे संकट आता भारतात येऊन घडकले आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. तसेच  भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आयपीएलबाबात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यास आयोजक तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आयपीएल स्पर्धेबाबत अजूनही अधिकृत प्रस्ताव आला नाही. मात्र गर्दी टाळायला हवी असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आयपीएलबाबत अंतिम निर्णय उद्या घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव संसर्गाने होत असल्याचे खबरदारी म्हणून गर्दी करणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आयपीएलच्या सामन्यांनाही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येत असतात. त्यामुळे संपर्क होऊन कोरोना विषाणू फैलावण्याची भीती आहे. त्यामुळे सामन्यांची तिकीट विक्री न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र आयपीएलवर मोठ्या प्रमाावर अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची सूचना करण्यात आलेली नाही. आता स्टेडियममध्ये येऊन सामने पाहता आले नाहीत तरी क्रिकेटप्रेमींना टीव्हीवरून आयपीलएलचा आस्वाद घेता येणार आहे.

दरम्यान, पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुबईवरून आलेल्या या कोरोना बाधित दाम्पत्याच्या निकटवर्तींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील दोन प्रवाशांची सुद्धा कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोग शाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता 7 वर पोहोचला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :आयपीएल 2020उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाभारतमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र