Champions Trophy 2025 Rift In Team India Team : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झालाय. २० फेब्रुवारीला भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात करेल. आयसीसी स्पर्धा गाजवण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण दिसणार? याची झलक इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील सामन्यात पाहायला मिळाली. विकेट किपर बॅटरच्या रुपात लोकेश राहुल की, रिषभ पंत हा मुद्दाही जवळपास निकाली लागलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विकेट किपरच्या रुपात कोण खेळणार ते चित्र झालंय स्पष्ट
कोच गौतम गंभीरनं विकेट किपर बॅटरच्या रुपात रिषभ पंत नव्हे तर लोकेश राहुल पहिली पसंती असल्याचे बोलून दाखवले आहे. पंतला बाकावर बसावे लागणार असल्याची चर्चा रंगत असताना अंतर्गत वादामुळे त्याच्यावर ही वेळ आलीये का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी संघात दरी निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील स्टोरी
पंतच्या मनात खंत, कोचवरही आहे नाराज
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडले आहे. ताफ्यात दरी निर्माण झाली आहे. भारताचा स्टार विकेट किपर कोच गंभीरवर नाराज आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो रिषभ पंतच आहे. बाहेरच्या कारणामुळे वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विचार केला जात नसावा, अशी शंकेची पाल पंतच्या मनात चुकचूकलीये. हाच मुद्दा गंभीर आणि पंत यांच्यात वादाची ठिणगी पाडणारा आहे, असा वृत्तामध्ये उल्लेख आहे. पण कोच किंवा खेळाडूनं स्पष्ट याबाबत कोणतही बाष्य तुर्तात केलेले नाही. रिषभ पंत कसोटी आणि टी-२० संघातील नियमित सदस्य असला तरी वनडेत त्याच्यावर संघ व्यवस्थापन अजूनही भरवसा दाखवताना दिसत नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे. (नॉन ट्रॅव्हलिंग प्लेयर)