Join us

मॅच पाकिस्तान अन् न्यूझीलंडची, पण चर्चा कराची स्टेडियमवर डौलात फडकताना दिसलेल्या आपल्या तिरंग्याची

सलामीच्या लढतीआधी पाकिस्तानमधील स्टेडियमवर भारतीय राष्ट्रध्वज न दिसल्यामुळे तापलं होत वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:35 IST

Open in App

 Indian Flag Has Been Hoisted In Pakistan's National Stadium Karachi : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. कराची स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यावेळी स्टेडियमवर डौलात फडकत असलेल्या तिरंग्यानं सर्वांच लक्षवेधून घेतलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

आधी भारतीय राष्ट्रध्वज दिसला नाही, त्याच स्पष्टीकरणही आलं, पण आता...

स्पर्धेच्या सलामी लढती आधी पाकिस्तानमधील स्टेडियमवर भारतीय राष्ट्रध्वज का फडकताना दिसला नाही? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. अन्य देशाचया राष्ट्रध्वजासह भारतीय राष्ट्रध्वज स्टेडियमवर का नाही? हा प्रश्न चर्चेत आल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर स्पष्टीकरणही दिले होते. पाकिस्तानमधील मैदानात जे संघ आपले सामने खेळणार आहेत त्या देशाचे राष्ट्रध्वज इथं लावण्यात आले आहेत. भारतीय संघ ज्या मैदानात उतरेल, तिथं भारतीय राष्ट्रध्वज दिसेल, असा काहीसा रिप्लाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आला होता. 

अखेर पाकिस्तानातील कराचीच्या स्टेडियमवर भारतीय राष्ट्रध्वज  दिसला 

सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे या स्पर्धेतील सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.  या स्पर्धेतील भारतीय संघाच्या बांगालदेश विरुद्धच्या पहिल्या लढती आधी पाकिस्तानच्या कराचीच्या स्टेडियमवर अखेर भारतीय राष्ट्रध्वज अगदी डौलानं फडकताना दिसला. या खास सीनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

२९ वर्षांनी पाकिस्तानला मिळालाय आयसीसी इवेंट आयोजित करण्याचा मान

पाकिस्तानमध्ये २९ वर्षांनी एखादी आयसीसी स्पर्धा खेळवली जात आहे. १९९६ मध्ये भारत-श्रीलंका आणि पाकिस्तान या तिन्ही देशांनी एकत्रित वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेवेळीही पाकिस्तान यजमान होता. पण त्याआधी २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाला अन् पाकिस्तानने मोठी संधी गमावली. आता पुन्हा पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन आले आहेत.   

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तानभारत विरुद्ध बांगलादेश