India T20 WC Semi Final Scenario : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या गटातील सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाच्या सेमीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे का? टीम इंडियाला सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी काय करावे लागेल? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. टीम इंडियाबाबत असा विचार करण्याची वेळ येईल, याची कल्पनाही कदाचित कुणी केली नव्हती. कारण भारतीय संघ गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आतापर्यंत एकही सामना गमावला नव्हता. इथं एक नजर टाकुयात टीम इंडियासाठी कसे असेल सेमीचं समीकरण यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
टीम इंडियाला धक्का, दक्षिण आफ्रिकेनं सेमीची दावेदारी केली भक्कम
सुपर ८ फेरीतील प्रत्येक गटात ४ संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघ या गटात तीन सामने खेळणार आहे. यातील अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये धडक मारतील. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या विजयासह सेमीची आपली दावेदारी मजबूत केली आहे. दुसरीकडे यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचा मार्ग थोडा खडतर झाला आहे.
IND vs SA : टीम इंडियाचा विजय रथ थांबला; दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी मारली बाजी! फलंदाजांमुळे ओढावली मोठी नामुष्की
उर्वरित सामने जिंकूनही 'जर तर'च्या समीकरणात फसणार टीम इंडिया! कारण...
भारतीय संघाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. भारतीय संघ यातील पहिला सामना यंदाच्या हंगामात मोठे उलटफेर करणाऱ्या झिम्बाब्बे विरुद्ध आहे. २६ फेब्रुवारीला चेन्नईच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारती संघ १ मार्च रोजी ईडन गार्डन्सच्या मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध भिडेल. भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. एक सामना गमावला तरी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे टीम इंडियासाठी प्रत्येक लढत ही 'करो वा मरो'ची असेल. दोन्ही सामने जिंकूनही ४ गुण कमावल्यावरही भारतीय संघाला अन्य संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागू शकते.
समजून घ्या सुपर ८ मधील चार संघासाठी कसे असेल सेमीचं समीकरण?
पहिल्या गटातील अव्वल दोन संघ सेमीसाठी पात्र ठरतील. जर गुण समान असतील तर नेट रनरेटचा फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरेल. इथंही समानता आढळली तर दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्डवर आणि यातही साम्य आढळल्यास ICC क्रमवारी पाहिली जाईल. ही वेळ भारतीय संघावर येऊ नये, अशीच अपेक्षा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याची असेल.