Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगला आवडतो टीम इंडियाचा हा खेळाडू 

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील चर्चा अनेकदा रंगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 12:00 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील चर्चा अनेकदा रंगतात. त्यामुळे अनेकदा अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं नाव जोडलं गेलं. त्यात लोकेश राहुलच्या अफेर्सबाबत सुनील शेट्टीची मुलगी अथियानं प्रेमाची कबुली दिली. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीला टीम इंडियातील फेेव्हरिट तुझा फेव्हरिट खेळाडू कोण, असा सवाल केला. तिनं दिलेलं उत्तर अनेकांना आश्चर्यात टाकणारे होते.

देसी बॉय आणि बाजार या चित्रपटातील नायिका चित्रांगदा सिंगला नेटिझन्सन तिचा फेव्हरिट क्रिकेटपटू कोण, असा सवाल केला. त्यावर तिनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं नाव सांगितलं.    धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' सहा षटकारानंतर झाली होती बॅटची तपासणी; खुद्द युवराजनं दिली माहिती

मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध

ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

MS Dhoni चं लक्ष वेधण्यासाठी साक्षीला काय काय करावं लागतंय? पाहा फोटो

संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

टॅग्स :चित्रांगदा सिंगमहेंद्रसिंग धोनी