Join us

बड़े मियाँ छोटे मियाँ...! शिखर धवनचा अभिनेता अक्षय कुमारसोबत जबरदस्त डान्स

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 20:08 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची जोरात चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे लेटेस्ट गाणे 'मस्त मलंग झूम' बुधवारी प्रदर्शित झाले आहे. अशातच अक्षयचा एक ताजा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवनसोबत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आगामी काळात अक्षय कुमार 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफही दिसणार आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली आहे. नुकतेच बडे मियाँ छोटे मियाँचे मस्त मलंग झूम हे गाणे रिलीज झाले आहे. गुरुवारी अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि अक्षय कुमार 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातील मस्त मलंग झूम गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 

अक्षय आणि शिखर यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अक्षय कुमारने लिहिले की, आव्हान स्वीकारले छोटे (टायगर श्रॉफ) शिखर धवन तुझे आभार. आता कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांचा नंबर आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. याआधी त्यांनी सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला होता.  

टॅग्स :शिखर धवनभारतीय क्रिकेट संघबॉलिवूडअक्षय कुमार