IPL सामन्यात सुरक्षेची मोठी चूक! चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २४०हून अधिक CCTV कनेक्शन कापले

गुरुग्राम येथील ‘स्टॅक्यू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या एआय सर्व्हिलन्स कंपनीचे कर्मचारी आदित्य भट्ट यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:17 IST2026-04-28T10:14:53+5:302026-04-28T10:17:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Big security blunder during IPL match! More than 240 CCTV connections cut at Chinnaswamy Stadium | IPL सामन्यात सुरक्षेची मोठी चूक! चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २४०हून अधिक CCTV कनेक्शन कापले

AI Generated Image

बंगळुरू - एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरक्षेची एक मोठी चूक पुढे आली. २४ एप्रिल रोजी बंगळुरू वि. गुजरात सामन्यादरम्यान २४० कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले. यामुळे सामन्याच्या दिवशी स्टेडियममधील अनेक भागांवर देखरेख ठेवणे कठीण झाले होते. दोन व्यक्तींनी स्टेडियममधील सुरक्षा उपकरणांचे नुकसान केले, ज्यामुळे २४०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले. बंगळुरू पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, या दोघांनी जाणूनबुजून नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर सिस्टिम आणि महत्त्वाच्या फायबर ऑप्टिक लिंकचे नुकसान केले. यामुळे स्टेडियमचे २४०हून अधिक कॅमेरे ऑफलाइन झाले होते. आरोपींची नावे मंजुनाथ (३७) व अब्दुल कलाम (१९) अशी आहेत. मंजुनाथ हा कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरचा रहिवासी आहे, तर अब्दुल कलाम उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. हे दोघेही एका सब-वेंडर कंपनीचे कर्मचारी होते. या कंपनीला स्टेडियमच्या डिजिटल आणि पाळत ठेवण्याच्या (सर्व्हिलन्स) सेवांचे काम देण्यात आले होते. 

गुरुग्राम येथील ‘स्टॅक्यू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या एआय सर्व्हिलन्स कंपनीचे कर्मचारी आदित्य भट्ट यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, दोन्ही आरोपींनी परवानगीशिवाय कंट्रोल रूममध्ये प्रवेश केला आणि तेथील साहित्याची तोडफोड केली. 

१० लाखांची थकबाकी
१० लाख रुपयांचे वेतन थकल्यामुळे हे दोन्ही कर्मचारी संतापले होते. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने रागाच्या भरात त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि सुरक्षा व्यवस्था विस्कळीत करणे याखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : आईपीएल में सुरक्षा चूक: चिन्नास्वामी स्टेडियम में सीसीटीवी फेल

Web Summary : आईपीएल मैच के दौरान चिन्नास्वामी स्टेडियम में 240 से अधिक सीसीटीवी कैमरे खराब हो गए क्योंकि वेतन न मिलने से नाराज कर्मचारियों ने तोड़फोड़ की। दो व्यक्तियों को नेटवर्क उपकरण को नुकसान पहुंचाने और आयोजन स्थल पर सुरक्षा भंग करने के आरोप में गिरफ्तार किया गया है।

Web Title : IPL Security Breach: CCTV Failure at Chinnaswamy Stadium

Web Summary : During an IPL match, over 240 CCTV cameras failed at Chinnaswamy Stadium due to sabotage by disgruntled employees over unpaid wages. Two individuals have been arrested for damaging network equipment and disrupting security at the venue.