Join us

वन डे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची 'अग्निपरीक्षा', भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

World Cup 2023 Schedule : भारतात आगामी वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:11 IST

Open in App

Australia tour of South Africa । नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या आधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळवली जाणार आहे. ३० ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार असून १७ सप्टेंबरला याची सांगता होईल. लक्षणीय बाब म्हणजे ही मालिका संपल्यानंतर दोन्हीही संघ विश्वचषकासाठी भारतात येतील. एकूणच विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका दोन्हीही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे. आयपीएल २०२३ नंतर विश्वचषकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा -

  1. पहिला ट्वेंटी-२० सामना, ३० ऑगस्ट
  2. दुसरा ट्वेंटी-२० सामना, १ सप्टेंबर
  3. तिसरा ट्वेंटी-२० सामना, ३ सप्टेंबर

वन डे मालिका

  1. पहिला सामना - ७ सप्टेंबर
  2. दुसरा सामना - ९ सप्टेंबर
  3. तिसरा सामना - १२ सप्टेंबर
  4. चौथा सामना - १५ सप्टेंबर
  5. पाचवा सामना - १७ सप्टेंबर 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाआयसीसीभारतआयपीएल २०२३
Open in App