आयपीलएल २०२५ थरार सुरू असताना भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे. भारतीय संघाने बॉर्डर- गावस्कर ट्राफीत केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह तीन जणांना पदावरून हटवले. बॉर्डर- गावस्कर मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील होणारी चर्चा बाहेर जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.
एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, फिल्डिंग प्रशिक्षक टी दिलिप आणि भारतीय संघाचे ट्रेनर सोहम देसाई यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नायर यांच्या जागी कोणाचीही नेमणूक केली जाणार नाही. कारण सितंशू कोटक आधीच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून टीम इंडियाशी जुडलेले आहेत. तर, फिल्डिंग प्रशिक्षकाची जबाबदारी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट यांच्याकडे सोपवली जाईल. सोहम देसाईचा जागा एड्रियन लि रु घेतील, जे सध्या आयपीएलमधील पंजाब किंगशी जुडलेले आहेत. ते २००८ ते २०१९ पर्यंत कोलकाता नाइट रायडर्स संघासोबत राहिले. तर, २००२ ते २००३ या कालावधीत त्यांनी भारतीय संघासोबत काम केले. बीसीसीआयशी त्यांचा करार झाला आहे.
बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. या मालिकेत भारताला ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने स्वत:तून विश्रांती घेतली. त्यावेळी भारतीय संघात काहीतरी खटल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधील बातमीही बाहेर आली, ज्यामुळे हे प्रकरण गरम झाले. याबाबत एका सदस्याने बीसीसीआयकडे तक्रार केली होती. बॉर्डर- गावस्कर मालिकेआधी भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध लज्जास्पद कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ३-० असा पराभव स्वीकाराला लागला.