काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर केलेल्या फॅट शेमिंगचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या प्रकरणात अनेकांनी शमा मोहम्मद यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत असताना आलेली ही कमेंट वादग्रस्त ठरताना दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिटमॅनला 'फॅटमॅन'चा टॅग लावणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा यांचा बीसीसीआयने घेतला समाचार
आता बीसीसीआयकडून या प्रकरणात प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिन देवजीत सैकिया यांनी हिटमॅन रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य करत त्याला 'फॅटमॅन'चा टॅग लावणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना सॉलिड रिप्लाय दिलाय. भारतीय संघाच्या कर्णधार रोहित संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्याचा समाचार घेतला आहे. शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधारासंदर्भात केलेली टिप्पणी दुर्भाग्यपूर्ण आहे, असे ते म्हणाले आहेत.
रोहितसंदर्भातील अपमानास्पद कमेंटवर नेमकं काय म्हणाले बीसीसीआयचे सचिव?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले आहेत की, " एखाद्या जबाबदार व्यक्तीकडून अशी टिप्पणी करणं दुर्भाग्यपूर्ण आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे एखाद्या खेळाडूचे किंवा टीमचे मनोबल ढासळू शकते. सर्व खेळाडू आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम देत आहेत. त्याचा रिझल्टही आपल्याला दिसतोय. मला आशा आहे की, स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्य कोणीही करू नयेत. कृपा करून तसं करू नका." अशा शब्दांत बीसीसीआय सचिवांनी काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद?
काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी २ मार्चला एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केलीहोती. यात त्याने रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत तो लठ्ठ असल्याचा उल्लेख केला होता. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीसह अन्य माजी कर्णधारांचा दाखला देत शमा मोहम्मद यांनी रोहित कॅप्टन्सीसाठी योग्य चेहरा नाही, असेही म्हटले होते. पोस्टवरून वाद निर्णाम झाल्यावर शमा मोहम्मद यांनी आपली पोस्ट डिलीट केली. पण या प्रकरणात आपली बाजू मांडताना त्यांनी एका खेळाडूच्या फिटनेसवर मी बोलले. मला जे दिसले ते व्यक्त होण्याचा मला अधिकार आहे, असे स्पष्टीकरणही दिल्याचे पाहायला मिळाले होते.