BCCI Naman Awards 2026 : टीम इंडियाची उप कर्णधार स्मृती मानधना आणि आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल यांचा रविवारी, १५ मार्च रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या बीसीसीआयच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. टीम इंडियाची 'क्वीन' स्मृती मानधनासाठी २०२४-२५ चा हंगामा खास राहिला. दुसरीकडे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिलनं वनडे आणि कसोटीतील कामगिरीच्या जोरावर BCCI कडून देण्यात येणाऱ्या खास पुरस्काराचा मानकरी ठरला.
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला २०२४-२५ या हंगामातील कामगिरीच्या जोरावर पॉली उमरीगर पुरस्काराचा मानकरी ठरला. पुरुष क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कर्णधाराची नवी जबाबदारी स्विकारल्यावर इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिलने नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून दिले होते.
शुभमन गिलची तिन्ही प्रकारातील कामगिरी
२०२५ हे वर्ष भारतीय कर्णधार शुभमन गिलसाठी एकदम खास राहिले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९८३ धावा केल्या, ज्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने ७० पेक्षा अधिक सरासरीने ७५४ धावा केल्या होत्या. वनडेमध्येही गिलने ४९० धावा केल्या. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. वर्षभरात तिन्ही प्रकारात भारताकडून सर्वाधिक १७६४ धावा करताना ७ शतकांसह तीन अर्धशतके झळकावली.
वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम
स्मृती मानधना ही गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसली आहे. भारताची उप कर्णधार स्मृतीनं गतवर्षी ३६ सामन्यांमध्ये १८०० धावा केल्या. यात ७ शतकांचा समावेश होता. यापैकी ६ शतके वनडे क्रिकेटमध्ये आली, तर एक शतक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आले. स्मृतीनं ३ वनडेत १३११ धावा केल्या तर १२ टी-२० सामन्यांत तिच्या खात्यात ४८९ धावा करुन सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली.