BCCI Naman Awards 2026 Winners Full List : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) वार्षिक नमन पुरस्कार सोहळा रविवारी, १५ मार्चला नवी दिल्लीमध्ये पार पडला. या खास सोहळ्यात क्रिकेटमधील योगदानाबद्दल दिग्गज क्रिकेटर्स आणि युवा खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या सोहळ्यात १९८३ चे वर्ल्ड चॅम्पियन संघाचे सदस्य आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny), भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासह महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी भारताची माजी कर्णधार मिताली (Mithali Raj) या दिग्गजांना भारतीयांना उल्लेखनीय सेवेसाठी BCCI च्या सर्वोच्च कर्नल सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारताचा सध्याचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल याला २०२४-२५ हंगामासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर स्मृती मानधना हिला महिला क्रिकेटमधील कामगिरीबद्दल सलग पाचव्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दीप्ती शर्मा आणि हर्षित राणा यांच्यासह इतर विजेते
हर्षित राणा याला पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला गटात श्री चरणी हिला या पुरस्कराने गौरवण्यात आले. हे दोन्ही खेळाडू आता भारतीय संघात नियमित झाले आहेत. दिप्ती शर्मा २०२४-२५ हंगामात भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पुरस्कार जिंकला आहे. तसेच आयुष म्हात्रे याने २०२४-२५ हंगामातील देशांतर्गत मर्यादित षटकांच्या स्पर्धांतील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून लाला अमरनाथ पुरस्कार पटकावला.
पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
जगमोहन डालमिया ट्रॉफी
- सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (ज्युनियर देशांतर्गत) २०२४-२५ : इरा जाधव (मुंबई)
- सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (सीनियर देशांतर्गत – सीनियर महिला वनडे) २०२४-२५: शेफाली वर्मा (हरियाणा)
- U-16 विजय मर्चंट ट्रॉफी (एलिट गट) सर्वाधिक विकेट्स: यशवर्धन सिंग चौहान (मध्य प्रदेश)
- U-16 विजय मर्चंट ट्रॉफी (प्लेट गट) सर्वाधिक विकेट्स: किशन सरकार (त्रिपुरा)
- U-16 विजय मर्चंट ट्रॉफी (एलिट गट) सर्वाधिक धावा: शांतनू सिंग (उत्तर प्रदेश)
- U-16 विजय मर्चंट ट्रॉफी (प्लेट गट) सर्वाधिक धावा: प्रीतम राज (बिहार)
एम. ए. चिदंबरम ट्रॉफी
- U-19 कूचबिहार ट्रॉफी (एलिट गट) सर्वाधिक विकेट्स: हेमचुदेशन जे (तामिळनाडू)
- U-19 कूचबिहार ट्रॉफी (प्लेट गट) सर्वाधिक विकेट्स: अर्कजित रॉय (त्रिपुरा)
- U-19 कूचबिहार ट्रॉफी (एलिट गट) सर्वाधिक धावा: नित्या जे. पांड्या (बडोदा)
- U-19 कूचबिहार ट्रॉफी (प्लेट गट) सर्वाधिक धावा: राघवन राममूर्ती (पुडुचेरी)
- U-23 कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी (एलिट गट) सर्वाधिक विकेट्स: विकी ओस्टवाल (महाराष्ट्र)
- U-23 कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी (प्लेट गट) सर्वाधिक विकेट्स: दीपज्योती सैकिया (आसाम)
- U-23 कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी (एलिट गट) सर्वाधिक धावा: मॅकनील एच. एन. (कर्नाटक)
- U-23 कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी (प्लेट गट) सर्वाधिक धावा: आर. जश्वंथ श्रीराम (पुडुचेरी)
माधवराव शिंदे पुरस्कार (रणजी ट्रॉफी २०२४-२५)
- एलिट गट सर्वाधिक विकेट्स: हर्ष दुबे (विदर्भ)
- प्लेट गट सर्वाधिक विकेट्स: सुचित जे (नागालँड)
- एलिट गट सर्वाधिक धावा: वाय. व्ही. राठोड (विदर्भ)
- प्लेट गट सर्वाधिक धावा: स्नेहल कौथंकर (गोवा)
लाला अमरनाथ पुरस्कार
- देशांतर्गत मर्यादित षटक स्पर्धांतील सर्वोत्तम अष्टपैलू: आयुष म्हात्रे (मुंबई)
- रणजी ट्रॉफीतील सर्वोत्तम अष्टपैलू: हर्ष दुबे (विदर्भ)
इतर प्रमुख पुरस्कार
- २०२४-२५ BCCI देशांतर्गत स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरी: मुंबई क्रिकेट असोसिएशन
- देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच: उल्हास गांधी (विदर्भ क्रिकेट असोसिएशन)
- महिला वनडे २०२४-२५ सर्वाधिक विकेट्स: दीप्ती शर्मा
- महिला वनडे २०२४-२५ सर्वाधिक धावा: स्मृती मंधाना
- महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वोत्तम पदार्पण: एन. श्री चरणी
- पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वोत्तम पदार्पण: हर्षित राणा
- महिला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: स्मृती मंधाना
- पॉली उम्रीगर पुरस्कार – पुरुष सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: शुभमन गिल
कर्नल सी. के. नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: रॉजर बिन्नी, राहुल द्रविड, मिताली राज