Rohit Sharma Unveiled Team India New T20I Jersey For T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी घरच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची नवी जर्सी लॉन्च केली. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मासहतिलक वर्माच्या हस्ते लॉन्च करण्यात आली नवी जर्सी
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या डावानंतर भारताचा माजी कर्णधार आणि गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा चॅम्पियन रोहित शर्मा याच्यासह टी-२० संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या तिलक वर्माच्या हस्ते या जर्सीचे अनावरण करण्यात आले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करताना रोहित शर्माला आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ICC चा ब्रँडअँबेसेडर करण्यात आले होते. त्यामुळेच रोहित शर्माच्या हस्ते नवी जर्सीची पहिली झलक सर्वांना दाखवण्यात आली. BCCI सचिव देवजीत साईकिया आणि Adidas च्या एका अधिकाऱ्यांने दोन क्रिकेटर्सकडे टी-२० विश्वचषकासाठी अधिकृत जर्सी सुपूर्द केल्याचे पाहायला मिळाले.
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
कशी आहे भारतीय टी-२० संघाची नवी जर्सी?
आगामी टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघासाठी जी जर्सी लॉन्च करण्यात आली आहे ती पूर्वीच्या जर्सीच्या रंगाशी मिळती जुळती आहे. या जर्सी गडद निळ्या रंगात असून बाजूच्या भागात केशरी रंगाची छटा दिसून येते. भारताच्या तिरंग्याची पट्टी आता जर्सीच्या कॉलरवर पाहायला मिळेल. जर्सीतील हा बदल लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. याशिवाय जर्सीवर उभ्या निळ्या पट्ट्या (vertical stripes) ही दिसून येत आहेत.