Team India च्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं

BCCI Latest News : बीसीसीआयने टीम इंडियाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:44 IST2024-08-13T20:44:14+5:302024-08-13T20:44:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BCCI issued revised schedule for international home season for ind vs ban and ind vs eng series in 2024-25  | Team India च्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं

Team India च्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं

BCCI announces revised schedule for : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताच्या वरिष्ठ संघाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहेत. टीम इंडिया आगामी काळात आपल्या मायदेशात बांगलादेश आणि इंग्लंडविरूद्ध मालिका खेळेल. १९ सप्टेंबरपासून भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. धर्मशाला येथे सलामीचा सामना नियोजित होता, मात्र आता बीसीसीआयने यात बदल केला आहे.

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांच्या स्थळांची अदलाबदलीची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-२० सामना कोलकाता येथे होईल. कोलकाता पोलिसांनी बंगालच्या क्रिकेट असोसिएशनला त्यांच्या प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या वचनबद्धता आणि दायित्वांबाबत केलेल्या विनंतीमुळे हे स्थळ बदलण्यात आले आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना धर्मशालाऐवजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. याशिवाय भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-२० सामना कोलकाता आणि दुसरा सामना चेन्नई येथे पार पडेल. 

बांगलादेशचा भारत दौरा
१९-२४ सप्टेंबर - पहिला कसोटी सामना, चेन्नई
२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कानपूर
६ ऑक्टोबर - पहिला ट्वेंटी-२० सामना, ग्वाल्हेर
९ ऑक्टोबर - दुसरा ट्वेंटी-२० सामना, दिल्ली 
१२ ऑक्टोबर - तिसरा ट्वेंटी-२० सामना, हैदराबाद

इंग्लंडचा भारत दौरा 
२२ जानेवारी - पहिला ट्वेंटी-२० सामना, कोलकाता 
२५ जानेवारी - दुसरा ट्वेंटी-२० सामना, चेन्नई
२८ जानेवारी - तिसरा ट्वेंटी-२० सामना, राजकोट
३१ जानेवारी - चौथा ट्वेंटी-२० सामना, पुणे
२ फेब्रुवारी - पाचवा ट्वेंटी-२० सामना, मुंबई
६ फेब्रुवारी - पहिला वन डे सामना, नागपूर
९ फेब्रुवारी - दुसरा वन डे सामना, Cuttack
१२ फेब्रुवारी - तिसरा वन डे सामना, अहमदाबाद

Web Title: BCCI issued revised schedule for international home season for ind vs ban and ind vs eng series in 2024-25 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.