भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी यो यो टेस्टचा टप्पा पार करावा लागतो. त्यात आता बीसीसीआयने क्रिकेटर्सच्या फिटनेससाठी नवा फंडा आजमावण्याचाही निर्णय घेतला आहे. या नव्या फिटनेस फॉर्म्युलानुसार, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आता रग्बी सेंट्रिक ब्रॉन्को टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. खेळाडूंचा फिटनेस मेंटन ठेवण्यासोबत एरोबिक कॅपिसिटी उंचावण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने ही टेस्ट लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. इथं आपण जाणून घेऊया टीम इंडियातील खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी द्यावी लागणारी ब्रॉन्को टेस्ट (Bronco Test) नेमकी कशी असेल? यो यो टेस्टच्या तुलनेत ती किती कठोर आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्ट्रेंथ अँण्ड कंडीशनिंग कोचच्या मताशी मुख्य कोच गौतम गंभीरही समहत
भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँण्ड कंडीशनिंग कोच एड्रियन ले रूक्स यांनी संघातील खेळाडूंच्या फिटनेससाठी ब्रॉन्को टेस्ट (Bronco Test) चा सल्ला दिलाय. एड्रियन यांना वाटते की, भारतीय गोलंदाजांनी जिमवर फोकस करण्यापेक्षा अधिक धावण्यावर भर दिला पाहिजे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील फिटनेस ट्रेनरच्या मताशी सहमत आहेत. काही खेळाडूंनी बंगळुरु स्थित सेंट्रल ऑफ एक्सेलेंस येथे ब्रॉन्को टेस्ट दिली आहे.
रग्बी सेंट्रिक ब्रॉन्को टेस्ट म्हणजे नेमक काय?
ब्रॉन्को टेस्ट (Bronco Test) ही फिटनेसचा दर्जा तपासण्यासाठीची लोकप्रिय चाचणी आहे. क्रिकेटशिवाय फुटबॉल, रग्बी, हॉकी यासारख्या खेळातील खेळाडूंचा स्टॅमिना (Aerobic Fitness), वेग आणि पुनरावृत्ती क्षमता तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. यात २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटर धावत जाऊन परत येणे या स्टेप्स यात फोलो केल्या जातात. एका सेटमध्ये खेळाडूला २४० मीटर धावावे लागते. असे पाच सेट म्हणजे १२०० मीटर सलग धावावे लागते. यो यो टेस्ट ही बॅटर अन् बॉलर दोघांसाठी उपयुक्त आहे. याउलट ही फिटनेस टेस्ट गोलंदाजांना फिटनेसचा दर्जा तपासण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल, असे दिसते.
यो यो टेस्ट आणि ब्रॉन्को टेस्ट यातील फरक काय?
मुद्दा | यो-यो टेस्ट | ब्रॉन्को टेस्ट |
---|---|---|
अंतर | २० मीटर पुढे-मागे धावणे (बीपनुसार) | 1200m सलग (20+40+60m रिपीट) |
वेळ मोजणी | बीप मशीन | स्टॉपवॉच |
फोकस | स्प्रिंट + रीकव्हरी क्षमता | स्टॅमिना + एंड्युरन्स |
निकाल | लेव्हल स्कोअर (उदा. १६.१) (उतीर्ण) | वेळ (उदा. ४:३० मिनिटे) (उत्तीर्ण) |
खेळाडूसाठी महत्त्व | सतत धावून परत तयार होण्याची क्षमता तपासली जाते | लांब वेळ सतत परफॉर्म करण्याची ताकद तपासण्यास उपयुक्त |