भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या आगामी मालिकेतील सामन्यांच्या ठिकाणांमध्ये बदल केला आहे. सोमवारी बीसीसीआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानात नियोजित असलेला सामना आता दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येणारा पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना आधी दिल्लीच्या मैदानात खेळवण्यात येणार होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २ ऑक्टोबर पासून या कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून दुसरा कसोटी सामना आता दिल्ली येथील अरुण जेटली मैदानातर रंगल्याचे पाहायला मिळेल.
T20 Mumbai 2025 : सगळं संपल्यावर आली जाग! सूर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध पृथ्वीनं ठोकली 'फिफ्टी'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे शेड्युल
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेनंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसह ३ सामन्यांची वनडे मालिका आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळताना दिसेल.
- १४ ते १८ नोव्हेंबर, २०२५- पहिला कसोटी सामना- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ईडन गार्डन्स, कोलकाता)
- २२ ते २६ नोव्हेंबर, २०२५ - दुसरा कसोटी सामना - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (बारसापारा, गुवाहाटी)
- ३० नोव्हेंबर, २०२५- पहिला वनडे सामना (रांची)
- ३ डिसेंबर, २०२५ - दुसरा वनडे सामना (रायपूर)
- ३ डिसेंबर, २०२५ - तिसरा वनडे सामना (विशाखापट्टणम)
- ९ डिसेंबर, २०२५ पहिला टी-२० सामना कटक
- ११ डिसेंबर, २०२५ दुसरा टी-२० सामना न्यू चंदीगड
- १४ डिसेंबर, २०२५ तिसरा टी २० सामना (धर्मशाला)
- १७ डिसेंबर, २०२५ चौथा टी-२० सामना (लखनौ)
- १९ डिसेंबर, २०२५ पाचवा टी-२० सामना (अहमदाबाद)
भारतीय महिला संघाच्या सामन्यातील ठिकाणांमध्येही बदल
चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील आउटफिल्ड आणि खेळपट्टीच्या काम सुरु असल्यामुळे इथं नियोजित भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना पंजाबच्या न्यू चंदीगड मैदानात खेळवण्यात येणार आहे. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने एकाच मैदानात खेळवण्यात येणार असून या मालिकेत अखेरचा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात खेळवण्यात येईल, अशी माहितीही बीसीसीआयने दिली आहे.
भारत 'अ' संघ कुणाविरुद्धचे सामने कोणत्या मैदानात खेळणार?
ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सामनेही या दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. भारत ‘अ’ संघ या दोन्ही संघाविरुद्ध प्रत्येकी २-२ कसोटी सामने खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धचे सामने लखनौ आणि कानपूरच्या मैदानात खेळवण्यात येतील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याचे यजमानपद हे बंगळुरुस्थित COE कडे देण्यात आले आहे. राजकोटमध्ये ३ वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत.