भारतीय नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. एप्रिलमध्ये भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुष्का शर्माला पहिली संधी, या चौघींचा पत्ता कट
जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका दौरा खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भारतीय महिला टी२० संघात अनुष्का शर्मा हिला पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे. तिच्यासह उमा छेत्री आणि काशवी गौतम यांचीही मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. वैष्णवी शर्मा, स्नेह राणा, जी. कमलिनी आणि अमनजोत कौर यांना संघातून वगळण्यात आले आहे. कमलिनीच्या जागी उमाला संघात घेतले गेले आहे.
IPL 2026: 'हा' नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी विघ्न? रोहित, हार्दिकनंतर आता अक्षर पटेलही भडकला!
जलदगती गोलंदाजी भक्कम करण्यावर भर, या तिघींवर असेल फिरकीची मदार
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिका २-१ अशी जिंकली होती. हाच रुबाब कायम ठेवत टी-२० वर्ल्ड कपसाठी उत्तम तयारी करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. टी२० मालिकेसाठी भारतीय संघाने जलदगी गोलंदाजी भक्कम करण्याला पसंती दिली असून फिरकीची धूरा दीप्ती शर्मासह श्री चरणी आणि श्रेयंका पाटील हिच्यावर असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा,रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी,रेणुका सिंह ठाकूर, क्रांती गौडॉ, श्री चरनी, श्रेयंका पाटील, काशवी गौतम, भारती फुलमाली, उमा छेत्री (विकेटकीपर), अनुष्का शर्मा.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना- १७ एप्रिल – डरबन
दुसरा साम- १९ एप्रिल – डरबन
तिसरा सामना- २२ एप्रिल – जोहन्सबर्ग
चौथा सामना- २५ एप्रिल – जोहान्सबर्ग
पाचवा सामना- २७ एप्रिल – बेनोनी