BCCI Announce Team India ODI Squad For South Africa KL Rahul Named Captain Ruturaj Gaikwad : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होत आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे BCCI निवड समितीने या मालिकेसाठी नवा कर्णधार निवडला आहे. दोन वर्षांनंतर केएल राहुल पुन्हा एकदा कार्यवाहू कर्णधाराच्या रुपात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऋतुराज गायवाडसाठी अखेर बीसीसीआयने टीम इंडियाचा दरवाजा उघडला
बीसीसीआयने १५ सदस्यी संघात अनेक युवा खेळाडूंवर भरवसा दाखवला आहे. यात ऋतुराज गायकवाड याला कमबॅकची संधी मिळाली आहे. भारत 'अ' संघाकडून त्याने दक्षिण आफ्रिका 'अ' संघा विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करुन दाखवली होती. ऋतुराज गायकवाडनं या मालिकेत एक शतक आणि अर्धशतकाच्या जोरावर संघाला मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या कामगिरीच्या जोरावर त्याची पुन्हा एकदा टीम इंडियात वर्णी लागली आहे. आगामी वनडे मालिकेत तो प्लेइंग इलेव्हनचा भागही दिसू शकतो. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध कानपूरच्या ग्रीन पार्कवर त्याने अखेरचा वनडे सामना खेळला होता.
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
अक्षर पटेलच्या जागी जड्डूची एन्ट्री, बुमराह- सिराजला विश्रांती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग असलेल्या अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाची वनडे संघात एन्ट्री झाली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आल्याचे दिसते. ही जोडी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग आहेत.
भारतीय संघ (IND ODI Squad vs South Africa 2025)
रोहित शर्मा, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, KL राहुल (कर्णधार / यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर,रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.