BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

हार्दिक पांड्या अन् हसरंगाही शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 22:08 IST2025-09-16T21:54:25+5:302025-09-16T22:08:32+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs AFG Rashid Khan Breaks Bhuvneshwar Kumar Record Most Wickets For Men's T20 Asia Cup Hardik Pandya Wanidu Hasaranga In List | BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rashid Khan Breaks Bhuvneshwar Kumar Record : अफगाणिस्ता विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील नववा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने मोठा विक्रम आपल्या नावे केला. भारताच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत टी-२० आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आता राशिद खानच्या नावे झाला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्याच षटकात पहिली विकेट; राशिदनं मोडला भुवीचा विक्रम

पहिल्यांदा फलंदाजी करताना सैफ हसन आणि तांझीन हसन तमीम या सलामी जोडीनं बांगलादेशच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. बांगलादेशच्या डावातील सातव्या षटकात सेट झालेली जोडी फोडण्यासाठी राशिद खान गोलंदाजीला आला. आपल्या पहिल्याच षटकात त्याने सैफ हसनच्या ३० (२८) रुपात पहिली विकेट घेत संघाला पहिले यश मिळवून दिले. या विकेटसह त्याने भुवनेश्वर कुमारची बरोबरी साधली. आपल्या कोट्यातील अखेरच्या षटकात राशिद खान याने शमीम हुसैन याची विकेट घेत भुवीच्या विक्रम मागे टाकत तो टी-२०  आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात राशिद खान याने ४ षटकात २६ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या.

IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...

हार्दिक पांड्या अन् हसरंगाही शर्यतीत

 टी २० आशिया कप स्पर्धेतील १० सामन्यातील १० डावात राशिद खानने आपल्या खात्यात १४ विकेट्स जमा केल्या आहेत. त्यापाठोपाठ या यादीत भुवनेश्वर कुमारचा नंबरलागतो. भुवीनं ६ सामन्यातील ६ डावात १३ विकेट्स घेतल्याची नोंद आहे.  पण भुवी सध्या टीम इंडियाचा भाग नाही.  श्रीलंकेचा हसरंगाने ८ सामन्यातील ८ डावात १२ विकेट्स घेतल्या असून त्याच्याशिवय हार्दिक पांड्याही १० सामन्यातील १० डावात १२ विकेट्ससह राशिद खानला टक्कर देत आहेत.  

आशिया कप टी २० स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • राशिद खान - १० सामन्यात १४ विकेट्स 
  • भुवनेश्‍वर कुमार - ६ सामन्यात १३ विकेट्स
  • वानिंदु हसरंगा - ८ सामन्यात १२ विकेट्स
  • अमजद जावेद - ७ सामन्यात  १२ विकेट्स
  • हार्दिक पांड्या - १० सामन्यात १२ विकेट्स

Web Title: BAN vs AFG Rashid Khan Breaks Bhuvneshwar Kumar Record Most Wickets For Men's T20 Asia Cup Hardik Pandya Wanidu Hasaranga In List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.