Pakistan Squad For Asia Cup 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं युएई आणि अफगाणिस्तान यांच्या विरुद्धच्या तिरंगी मालिकेसह आशिया कपसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केलीये. या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानशिवाय जलदगती गोलंदाज नसीम शाह यालाही ठेंगा दाखवण्यात आला आहे. सलमान आगाच्या नेतृत्वाखालील संघ टीम इंडियाच नव्हे तर कोणत्याही संघाला पराभूत करण्यात सक्षम आहे, असे मत संघ निवडीनंतर मुख्य निवडकर्ता आकिब जावेद यांनी व्यक्त केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० नंतर फुसका बार ठरलीये टीम
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून पाकिस्तान संघाने आतापर्यंत ७ टी-२० मालिका खेळल्या आहेत. नव्या बदलासह मैदानात उतरणाऱ्या पाकिस्तानी संघाने यातील फक्त ३ मालिका जिंकल्यात. यात त्यांनी ज्या मालिका जिंकल्यात त्यात झिम्बाब्वे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेसह वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! सूर्यकुमारची झाली फिटनेस चाचणी, निकाल काय?
मुख्य निवडकर्त्याला सलमानच्या नेतृत्वाखालील संघावर विश्वास, म्हणाले...
तुम्हाला आवडो ना आवडो, पण आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेला पाकिस्तानचा संघ हा टीम इंडियासह कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता असणारा संघ आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत ही मोठी आहे. आम्ही खेळाडूंवर अतिरिक्त दबाव आणणार नाही. या सामन्याचे महत्त्व प्रत्येक खेळाडूला माहिती आहे, असे सांगत आगामी आशिया कप स्पर्धेत सलमानच्या नेतृत्वाखालील संघ हिट शो देईल, असे मत मुख्य निवडकर्ता आकिब जावेद यांनी व्यक्त केले आहे. संघ निवडीनंतर निवडकर्त्याने बोलंदाजीतून दाखवलेला ट्रेलर भारीये! पण सलमानच्या नेतृत्वाखालील पाक संघ टीम इंडियासमोर हिट शो देईल, हे म्हणजे फ्लॉप शोची भीती दूर करण्याचा एक केविलवाणा प्रयत्नच आहे, असे म्हणावे लागेल. कारण पाक क्रिकेटमध्ये जे सध्या सुरुये ते पाहता टीम इंडियासमोरच काय तर आशिया कप स्पर्धेतही त्यांचा निभाव लागेल, असे वाटत नाही.
यूएईतील तिरंगी मालिकेसह आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ:
सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर झमान, हॅरिस राउफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान अयुब, सलमान ए मुफ्री, शाहिस्ते, मोहम्मद वसीम.
Web Title: Babar Azam Mohammad Rizwan left out of Asia Cup Pakistan Squad Chief Selector Says Salman Agha Lead Team Ability To Beat India And Any Team Ahead of Asia Cup 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.