Join us

Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

कमालीचा योगा योग म्हणजे सूर्यकुमार यादवनंही हाँगकाँगचीच केली होती धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 23:10 IST

Open in App

Azmatullah Omarzai Breaks Suryakumar Yadav Asia Cup T20 Fastest Fifty Record : अफगाणिस्तानच्या अष्टपैलू  अझमतुल्लाह ओमरझाईनं आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा मोठा विक्रम मोडित काढला आहे. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करताना अझमतुल्लाह ओमरझाई याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिले अर्धशतक झळकवताना त्याने मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाकडून कोणत्याही खेळाडूनं केलेली ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. यासोबत त्याने आशिया कप टी-२० स्पर्धेतील सुर्यकुमार यादवच्या विक्रमालाही सुरुंग लावला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

५० सामन्यानंतर पहिले अर्धशतक; तेही विक्रमी

आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ५३ व्या सामन्यातील ४३ व्या डावात ओमरझाीनं आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतल पहिली फिफ्टी ठोकली. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना त्याने २१ चेंडूत २ चौकार आणि५ षटकाराच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. त्याने २५२.३८ च्या सरासरीसह या धावा कुटल्या. अफगाणिस्तानच्या संघाकडून २० चेंडूतील जलद अर्धशतकासह त्याने आशिया कप टी -२० स्पर्धेतील सूर्यकुमार यादवचा विक्रमही मोडीत काढला. 

Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!

सूर्या दादाचा विक्रम मोडला

 यंदा तिसऱ्यांदा आशिया कप स्पर्धा ही टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे. या आधी छोट्या फॉरमॅटमधील आशिया कप स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा अफगाणिस्तानच्या रहमनुल्लाह गुरभाझसह सूर्यकुमार यादवच्या नावे होता. दोघांनी २२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवनं २०२२ च्या हंगामातील टी-२० आशिया कप स्पर्धात हाँगकाँगविरुद्धच जलद अर्धशतकाचा डाव साधला होता. नाबाद ६८ धावांची खेळी करताना सूर्यनं २६१.५३ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या होत्या. या स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राइक रेटसह धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत  सूर्यकुमार अजूनही अव्वल असला तरी जलद अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये ओमरझाई आता अव्वलस्थानी विराजमान झालाय. 

अफगाणिस्तानकडून सर्वात जलद अर्धशतकी खेळी

आशिया कप स्पर्धेतील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याआधी अफगाणिस्तानच्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम हा संयुक्तरित्या मोहम्मद नबी आणि गुल्बादीन नाइब  या दोघांच्या नावे होता. गुल्बादीन नाइब  याने २०२४ मध्ये भारतीय संघाविरुद्ध  तर मोबम्मद नबीनं २०१७ मध्ये आयर्लंड विरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. ओमरझाई याने २० चेंडूत अर्धशतक साजरे करत या दोघांना मागे टाकले आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपसूर्यकुमार यादवअफगाणिस्तान