Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी

Axar Patel Wedding: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 05:18 PM2023-01-27T17:18:23+5:302023-01-27T17:19:15+5:30

whatsapp join usJoin us
Axar Patel imitates cricket moves in wedding ceremony dance on stage watch here video  | Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी

Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Axar Patel Marriage Video । नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जानेवारीला सलामीवीर केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. आता त्याच्यानंतर स्टार अष्टपैलू अक्षर पटेलने देखील लग्नगाठ बांधली आहे. अक्षरने त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत सात फेरे घेतले. अक्षर पटेलचे गुरुवारी (26 जानेवारी) गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. अक्षरच्या मिरवणुकीचा व्हिडीओही समोर आला आहे. अक्षरची वरात घोड्यावरून न निघता कारमधून निघाली. त्याच्यासोबत कुटुंबीय देखील कारमध्ये बसलेले दिसले. क्रिकेटर जयदेव उनाडकटही लग्न सोहळ्यास हजर होता.

जयदेव उनाडकटने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यासोबतच अक्षर पटेलनेही त्याची वधू मेहासोबत संगीत सेरेमनीमध्ये डान्स केला. या डान्सचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होत आहे. अक्षर पटेल आणि मेहाचे हळदीचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. अक्षर पटेल आणि मेहा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मेहा आणि अक्षर यांचा मागील वर्षी सारखपुडा झाला होता. आता दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. लग्नानंतर अक्षर पटेल नृत्य करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो क्रिकेटच्या क्रिया करताना दिसत आहे. सुरुवातीला तो  फलंदाजी क्रमाचे अनुकरण करत आहे आणि त्यानंतर अक्षरने झेल पकडतानाचे हावभाव करून सर्वांचे लक्ष वेधले. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

कोण आहे अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल? 
मेहा पटेल ही व्यवसायाने एक न्यूट्रिशनिस्ट आहे. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करते. अक्षर पटेल आणि मेहा अनेकवेळा एकत्र सुट्टी घालवताना दिसले आहेत. नुकतेच दोघेही अमेरिकेला गेले होते.

वैयक्तिक कारणासाठी BCCI कडे मागितली सुट्टी
अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळली होती. त्यात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंड विरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने याबाबत माहिती दिली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    


 


 

Web Title: Axar Patel imitates cricket moves in wedding ceremony dance on stage watch here video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.