मुंबई - भारतीय टीमला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. या मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल याला डच्चू देण्यात आले होते. अक्षर पटेल बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही खेळीने सामना कधीही बदलू शकतो. मात्र दक्षिण आफ्रिकेविरोधात मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून त्याला ड्रॉप देण्यात आल्याने अक्षर पटेल चांगलाच संतापला होता. रागावलेल्या अक्षरची टीम इंडिया कॅप्टन सूर्यकुमार यादव याने माफी मागितल्याचा खुलासा झाला आहे.
सूर्यकुमार यादवने अक्षर पटेल याची माफी मागितली होती. सूर्यकुमार म्हणाला की, तो खूप रागवला होता. त्याला राग येणे स्वाभाविक होते. तो एक अनुभवी खेळाडू आहे. एका फ्रेंचाइजीला तो लीड करतो. त्याला राग येणार होता. मी त्याची माफी मागितली. माझी चूक झाली आणि मला खेद वाटतो. परंतु हा टीमसाठी घेतलेला निर्णय होता असं त्याने स्पष्ट केले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला. सूर्यकुमार यादवला अक्षर पटेलसोबत बोलणे कठीण झाले होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यावर दोघांमध्ये चर्चा झाली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. सुंदरने फक्त दोन षटके टाकली आणि १७ धावा दिल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या. भारताने तो सामना ७६ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. हा पराभव टीमसाठी एक धडा होता असंही सूर्यकुमार यादवनं म्हटलं. दक्षिण आफ्रिकेचा सामना आमच्यासाठी डोळे उघडणारा होता. मला या टीमवर कधीही शंका नव्हती, परंतु यामुळे धडा घेतला. त्यानंतर आमच्याकडे परतीचा मार्ग नव्हता. आमच्यासाठी झिम्बाब्वेचा सामना प्री-क्वार्टरफायनल होता, वेस्ट इंडिजचा सामना क्वार्टरफायनल होता नंतर सेमी-फायनल आणि फायनल होता. आम्हाला प्रत्येक सामना नॉकआउटसारखा खेळायचा होता असं सूर्याने सांगितले.
अक्षर पटेलची सुपर फिल्डिंग
सेमी फायनलमध्ये अक्षर पटेल याने भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली. आधी त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्सची सेट झालेली जोडीही त्याने आपल्या फिल्डिंगच्या जोरावर फोडली. विल जॅक्स त्याने शिवम दुबेच्या साथीनं घेतलेला झेल टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा होता. त्याच्या या झेलचं सर्वांनीच कौतुक केले.
Web Summary : Axar Patel was upset after being dropped. Suryakumar Yadav apologized, explaining it was a team decision. Axar's crucial fielding later helped India reach the final.
Web Summary : अक्षर पटेल को बाहर किए जाने पर नाराज़गी हुई। सूर्यकुमार यादव ने माफी मांगी, और कहा कि यह टीम का निर्णय था। बाद में अक्षर की फील्डिंग से भारत फाइनल में पहुंचा।