Alyssa Healy Scores Century In Final Odi Before Retirement Mitchell Starc Reaction Viral : ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार एलिसा हीली हिने आपल्या वनडे कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात १५८ धावांची तुफानी खेळी करत इतिहास रचला. महिला वनडे इतिहासात शेवटच्या सामन्यात शतक झळकावणारी ती केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेची जोमारी लॉगटेनबर्ग (Johmari Logtenberg) हिने आपल्या अखेरच्या वनडेमध्ये १५३ धावांची नाबाद खेळी साकारली होती.
बायकोचं विश्वविक्रमी शतक अन् कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या नवऱ्याचा आनंद गगनात मावेना
भारताविरुद्धच्या सामन्यात हीलीने ९८ चेंडूत १५८ धावा करत २७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. तिचा स्ट्राईक रेट १६१.२२ इतका होता. अवघ्या ७९ चेंडूत शतक पूर्ण करत तिने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. हे तिच्या कारकिर्दीतील आठवे वनडे शतक ठरले. हीलीच्या विश्वविक्रमी शतकानंतर तिचा पती आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टार मिचेल
स्टार्क (Mitchell Starc) समालोचन कक्षात उपस्थित होता. पत्नीच्या ऐतिहासिक खेळीनंतर त्याचा आनंद गगनात मावेना असाच होता.
T20 World Cup मध्ये वेस्ट इंडिजनं एकदा दोनदा नव्हे तीन वेळा टीम इंडियाला दिला आहे धक्का; इथं पाहा रेकॉर्ड
वनडे कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात विश्वविक्रमी खेळी
महिला वनडे इतिहासात अखेरच्या सामन्यातील सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आता हीलीच्या नावावर झाला आहे. हीलीने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले होते. १२६ सामन्यांतील ११४ डावांत तिने एकूण ३७७७ धावा केल्या असून त्यात ८ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे.
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचा रुबाब
वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिका विजयासह दमदार सुरुवात केली. पण वनडेत संघाला चॅम्पिनयवाला रुबाब दाखवता आला नाही. पहिल्या दोन वनडेतील पराभवानंतर क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी टीम इंडिया होबार्टच्या मैदानात उतरली. पण ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना एलिसा हिलीच्या दिडशतकी खेळीशिवाय बेथ मूनीने ८४ चेंडूतील १०६ धावांच्या खेळीच्या दोरावर ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात ४०९ धावा करत भारतीय संघासमोर ४१० धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंखेचा पाठलाग करताना ना स्मृती मानधनाची बॅट तळपली ना कर्णधार हरमनप्रीतला मैदानात तग धरता आला. जेमिमा रॉड्रिग्जने २९ चेंडूत केलेल्या ४२ धावांशिवाय अन्य कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघ सामन्यात कमी पडला.