Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अगं थांब…" हरमनप्रीतकडे न पाहताच सुसाट धावली अन् प्रतिकाला धरावा लागला पॅव्हेलियनचा रस्ता! (VIDEO)

हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांच्यात ताळमेळाचा अभाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:01 IST

Open in App

Australia Women vs India Women 2nd ODI Pratika Rawal Gets Run Out After Mix Up With Harmanpreet Kaur : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील दुसरा वनडे सामना होबार्टच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून सावरुन संघात परतलेल्या प्रतिका रावल हिने या सामन्यात दमदार कमबॅक केले. पहिल्या वनडेत खातेही उघडू शकलेल्या प्रतिकानं अर्धशतकी भागीदारी केली. पण अर्धशतकानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत ताळमेळाचा अभाव तिच्यासह संघाला चांगलाच महागात पडला. एक चोरटी धाव घेण्यासाठी तिने गडबड केली अन् तिच्या खेळीला ५२ धावांवर ब्रेक लागला. हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांच्यात ताळमेळाचा अभाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

अर्धशतकी खेळीसह एका डावात दोन खास विक्रमाला गवसणी 

प्रतिका रावल ही महिला क्रिकेट संघात सलामीवीराच्या रुपात हुकुमाची राणी ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तिने अर्धशतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली. अवघ्या २५ व्या डावात वनडेत तिने दहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव साधला. वनडेत सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत प्रतिका रावल संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे.  २३ डावात तिने हा पल्ला गाठला होता.  

टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं

स्मृतीच्या साथीनं प्रतिकानं संघाला करुन दिली दमदार सुरुवात

होबार्टच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी संघाला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ९९ चेंडूत ७८ धावांची भागीदारी रचली.  स्मृती ३१ धावा करून परतल्यावर प्रतिकानं जेमिमा रॉड्रिग्जसह अल्पभागीदारी रचली. जेमीची विकेट पडल्यावर हरमनप्रीत कौरच्या साथीनं ती संघासाठी  आणखी एक भागीदारी करेल, अशी अपेक्षा होती. पण  संघाच्या धावफलकावर १०० धावा असताना २३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्रतिका रावल रनआउट झाली.  

चेंडू सरळ हातात मारून चोरटी धाव घेण्याच्या नादात फसली

भारताच्या डावातील २३ व्या षटकात  अलाना किंगच्या दुसऱ्या चेंडूवर प्रतिका रावल हिने मिडऑनच्या दिशेनं चेंडू टोलवला. चेंडू सरळ फिल्डरच्या हातात असताना तिने एक धावा घेण्याची रिस्क घेतली. नॉनस्ट्राइकवर असलेल्या हरमनप्रीत कौरनं धावा होत नसल्याचे ओळखून तिला माघारी धाडले. पण प्रतिका चेंडू मारल्यावर अगदी सुसाट निम्म्या क्रिजहून अधिक पुढे आली होती. त्यामुळे तिला पॅव्हिलियनचा रस्ता धरावा लागला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rawal run-out after mix-up with Kaur in Australia ODI.

Web Summary : Pratika Rawal's impressive comeback ended with a run-out after a mix-up with Harmanpreet Kaur during the second ODI against Australia. Rawal scored 52 runs before the unfortunate dismissal, highlighting a moment of miscommunication between the two cricketers.
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाजेमिमा रॉड्रिग्ज