Join us

दक्षिण आफ्रिकेला शह देत ऑस्ट्रेलियानं केली पाकच्या विक्रमाशी बरोबरी; पण टीम इंडियाला तोड नाय!

ऑस्ट्रेलियानं  सलग ९ विजयासह केली पाकची बरोबरी! पण टीम इंडिया दोघांपेक्षा भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:26 IST

Open in App

Australia vs South Africa, 1st T20I  : मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने घरच्या मैदानातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी मात देत विजयी सलामी दिली. डार्विन येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित २० षटकात १७८ धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित २० षटकात १६१ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यातील विजयासह कांगारुंच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी तर घेतलीय. पण टी-२० मध्ये सलग नववा विजय नोंदवत पाकिस्तान संघाच्या विक्रमाशीही बरोबरी साधलीये. ऑस्ट्रेलियन संघाच्या विक्रमी विजयामुळे भारताचा एक खास रेकॉर्ड धोक्यात आलाय. एक नजर त्यासंदर्भातील खास स्टोरीवर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऑस्ट्रेलियानं  सलग ९ विजयासह केली पाकची बरोबरी! पण टीम इंडिया दोघांपेक्षा भारी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने याआधीच्या कामगिरीत सुधारणा करत सलग ९ टी-२० सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी पाकिस्तान संघाची बरोबरी केलीये. पण याबातीत टीम इंडिया अजूनही या दोन्ही संघाच्या खूप पुढे आहे. टीम इंडियाचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या टप्प्यात असला तरी तो मोडणं वाटतं तेवढं सोप नाही. कारण यासाठी त्यांना अजून सलग चार सामने जिंकावे लागतील.

Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर कमबॅकसाठी फिट; सूर्या भाऊ अन् कुंफू पांड्याची फिटनेस टेस्ट अजून बाकी

 भारतीय संघाचा टी-२० तील रेकॉर्ड

२०२१ ते २०२२ या कालावधीत भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सलग १२ सामने जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. त्यामुळे हा विक्रम मोडीत काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानातील तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला व्हाइट वॉश देऊन आणखी एका विजयाची प्रतिक्षा करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांना ही संधी देईल, असे वाटत नाही.

लिंबू टींब संघाच्या नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या खूप पुढे आहे. पण वर्ल्ड रेकॉर्ड हा लिंबू टिंबू अशा युगांडा संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग १७ सामने जिंकले आहेत. यापाठोपाठ या यादीत स्पेन १५ टी-२० सामन्यासह दुसऱ्या तर जपान १४ सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलेशिया आणि बर्म्युडा संघानेही सलग १३-१३ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. एकंदरीत यादीत भारतीय संघ या संघाच्या मागे असला तरी आयसीसीच्या कायमस्वरुपी सदस्य असणाऱ्या देशांच्या यादीत टीम इंडिया टॉपला आहे. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका