Join us

AUS vs IND : बुमराहचा 'पंजा'! कपिल पाजींशी बरोबरी अन् अक्रमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम

बुमराहनं दिग्गज आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन पेक्षाही बेस्ट कामगिरी नोंदवली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:34 IST

Open in App

Jasprit Bumrah Record : पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवत 'पंजा' मारला. या कामगिरीसह त्याने टीम इंडियाला मॅचमध्ये आणलेच. याशिवाय खास विक्रमाला गवसणी देखील घातली.  सेना  (SENA) देशात म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानात सर्वाधिक वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने कपिल पाजींची बरोबरी केलीये. एवढेच नाही तर बुमराहनं दिग्गज आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन पेक्षाही बेस्ट कामगिरी नोंदवली आहे. 

वसीम अक्रमला मागे टाकले कपिल पाजींची बरोबरी   

जसप्रीत बुमराहनं सेना देशांत ५१ डावात ७ वेळा ५ विकेट घेण्याचा पराक्रम करून दाखवलाय. कपिल देव यांनी  ६२ डावांत ७ वेळा पाच विकेट्स हॉलची कामगिरी नोंदवली आहे. याशिवाय सेना देशांत सर्वोत्तम सरासरीच्या बाबतीत बुमराहनं पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकले आहे. सेना देशात सर्वोच्च सरासरीच्या बाबतीत बुमराह आशियातील नंबर वन गोलंदाज आहे.

SENA देशांत आशियायी गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी (कमीत कमी ५० विकेट्स)

  • २२.६३ - जसप्रीत बुमराह*
  • २४.११ - वसीम अक्रम
  • २५.०२ - मोहम्मद आसिफ
  • २६.५५ - इम्रान खान
  • २६.६९ - मुरलीधरन

SENA देशांत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारे आशियाई गोलंदाज

  • ११ - वसीम  अक्रम
  • १० - मुथय्या मुरलीधरन 
  • ८ - इम्रान खान 
  • ७ - कपिल देव
  • ७ - जसप्रीत बुमराह*

फक्त १०.१ षटकात ५ विकेट्स 

पर्थ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं फक्त १०.१  षटकांच्या गोलंदाजीत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला. याआधी त्याने २०१९ मध्ये जमेकाच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध ५.५ षटकात ५ विकेट घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ विकेट्स घेण्याचा विक्रम हा  हरभजन सिंगच्या नावे आहे. २००६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याने ४.३ षटकांमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या. 

ऑस्ट्रेलियात खास कामगिरीचा विक्रम

जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियन मैदानात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. याबाबतीत बुमराहनं  माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांना मागे टाकले. बिशन सिंग बेदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या मैदानात ३५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत कपिल पाजी ५१ विकेट्सह अव्वलस्थानी आहेत. पर्थच्या मैदानात विकेट घेणारा बुमराह हा भारताचा तिसरा कॅप्टन आहे. याआधी बिशन सिंग बेदी आणि अनिल कुंबळे यांनी या मैदानात कॅप्टन्सीत विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघकपिल देव