Rohit Sharma Steps Onto The Field And Talking With Jasprit Bumrah And Rishabh Pant : भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. हा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्याच्या कसोटी कारकिर्दीला सिडनीत पूर्ण विराम लागलाय, अशीही चर्चा रंगत आहे. एका बाजूला रोहित संदर्भात नकारात्म चर्चा रंगत असताना बाकार बसल्यावरही तो सकारात्मक अंदाजात संघाला सपोर्ट देताना दिसते. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तर ड्रिंक ब्रेक दरम्यान रोहित शर्मा चक्क 'वॉटर बॉय'च्या रुपात फिल्डवर आल्याचे पाहायला मिळाले. तो जसप्रीत बुमराह आणि पंतसोबत चर्चा करताना स्पॉट झाले. हा सीन एकदम खास होता.
प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी टीम इंडियातील खेळाडूंशी कनेक्ट असल्याचे दिसते रोहित
सिडनी कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधीच रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसणार, अशी चर्चा रंगली होती. जसप्रीत बुमराह टॉसला आल्यावर ही चर्चा खरी ठरली. पण त्यानंतर रोहितला सक्तीची विश्रांती दिलीये की, त्याने स्वत:हून आपल्यासंदर्भात निर्णय घेतलाय अशी चर्चा रंगली होती. मॅचमध्ये संघासोबत कनेक्ट राहून तो नाराज नाही, याचे चित्रही पाहायला मिळाले. भारतीय संघ मैदानात उतरताना बाउंड्री लाइन थांबण्यापासून ते सामन्यादरम्यान घडणाऱ्या बारिक सारिक गोष्टीवरील त्याची नजर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी टीम इंडियाशी कनेक्ट आहे, ते पाहायला मिळाले होते. त्यानंतर सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ड्रिंक्स ब्रेकमध्ये वॉटर बॉयच्या रुपात मैदानात एन्ट्री मारत तो बुमराह आणि पंतशी चर्चा करताना दिसून आले.
बुमराहच्या नेतृत्वाखाली सिडनी कसोटीत टीम इंडिया दमदार कमबॅक करणार?
पर्थच्या कसोटी सामन्यानंतर बॉर्डर गावसकर स्पर्धेतील सिडनीच्या मैदानातील दुसरा सामना आहे, ज्यात भारतीय संघ रोहितशिवाय मैदानात उतरला आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून देताना दिसते. सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग केली. पहिल्या डावात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी कोलमडली. परिणामी संघाने पहिल्या डावात १८५ धावांत आटोपली. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी कंबर कसली असून ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत धाडत हा सामना सोडणार नाही, याचे संकेत दिले आहेत.
Web Title: Australia vs India 5th Test Day 2 Rohit Sharma Steps Onto The Field And Talking With Jasprit Bumrah And Rishabh Pant During The Drinks Break
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.