Join us

AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण...

टी ब्रेकपर्यंतच्या खेळात त्याने दाखलेला संयम टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा असाच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:57 IST

Open in App

AUS vs IND, Rishabh Pant is taking blows to the body. He has become Cheteshwar Pujara For Team India : मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं अवघ्या ३३ धावांत आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या. भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला असताना रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं मैदानात तग धरत लढाई एकतर्फी होऊ देणार नाही, याचे संकेत दिले. चहापानापर्यंत या जोडीनं भारतीय संघाच्या धावफलकावर ११२ धावा लावल्या. यादरम्यान दोघांनी १४५ चेंडूत  चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची आश्वासक भागीदारी केली.

टी ब्रेकपर्यंत पंतन दाखवलेला संयम टीम इंडियाला  मोठा दिलासा देणारा 

एका बाजूला यशस्वीनं अर्धशतकाला गवसणी घातली. दुसरीकडे रिषभ पंत आपली नैसर्गिक खेळी बाजूला ठेवून पुजाराच्या अंदाजात खेळताना दिसला. रिस्क घेण्यापेक्षा शरीराची ढाल करून त्याने काही चेंडू शरीरावर घेणं पसंत केल. त्याचा हा अंदाज पुजाराची आठवण करून देणारा होता. पहिल्या डावात रिषभ पंत चुकीचा फटका मारून आउट झाला होता. ही चूक यावेळी करणार नाही त्याचे संकेत त्याने दुसऱ्या डावातील खेळीतून दिले. ९३ चेंडूचा सामना करताना २ चौकारासह त्याने केलेली २८ धावांची खेळी करत संयम दाखवून देण्याच्या परीक्षेचा पहिला टप्पा त्याने पाक केल्याचा सीनच दाखवून देणारी होती.  टी ब्रेकपर्यंतच्या खेळात त्याने दाखलेला संयम टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा असाच आहे.

टी-ब्रेकनंतर ट्रॅविस हेडच्या गोलंदाजीवर फसला पंत,  पण...

पण, टी ब्रेकनंतर मात्र त्याचा हा संयम सुटला. पार्ट टाइम बॉलर ट्रॅविस हेडच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. त्याचा हा शॉट  शंभरपेक्षा अधिक चेंडू खेळताना दाखवलेल्या संयमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारा आहे, पण  दुसऱ्या डावात रिषभ पंतनं १०४ चेंडूंचा सामना करताना ३० धावांची खेळी करत  यशस्वी जैस्वालसोबत चौथ्या विकेटसाठी जी ८८ धावांची भागीदारी रचली ती टीम इंडियाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी असली तरी त्याच्या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाला मॅचमध्ये येण्याची संधीही निर्माण करणारी आहे. 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियायशस्वी जैस्वाल