Join us

AUS vs IND : नाद केला अन् बाद झाला! बाहेर जाणाऱ्या चेंडूवर 'किंग' कोहली पुन्हा फसला (VIDEO)

स्टार बॅटरची ही खोड त्याच्यासह टीम इंडियाला अडचणीत टाकणारी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:18 IST

Open in App

Hazlewood Dismisses Virat Kohli Cheaply On Outside Off Stump  Delivery : ब्रिस्बेन येथील गाबा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. आघाडीला स्टार्कनं धक्क्यावर धक्के दिल्यानंतर जोश हेजलवूडनं किंग कोहलीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. जोश हेजलवूडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट कोहली फसला. भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली सातत्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विकेट फेकत आहे. हा नाद त्याला सातत्याने बाद ठरवतोय. विराट कोहली नेट प्रॅक्टिसमध्ये चेंडू सोडण्याचा सराव करतानाही दिसते. पण मैदानात तो  स्वत:वरील नियंत्रण हरवून बसतोय, असे चित्र वारंवार पाहायला मिळते.  स्टार बॅटरची ही खोड त्याच्यासह टीम इंडियाला अडचणीत टाकणारी आहे. भारतीय संघाच्या धावफलकावर २२ धावा असताना हेजलवूडनं पुन्हा एकदा विराटच्या दुखत्या नसीवर बोटं ठेवत टीम इंडियाला तिसरा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. 

पुन्हा तोच पॅटर्न, जोश हेजलवूडनं सातत्याने त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत कोहलीला  फसवलं

दुसऱ्या कसोटीला मुकल्यावर गाबा कसोटीत कमबॅक करणाऱ्या जोश हेझलवूडने पुन्हा एकदा किंग कोहलीची शिकार केली. सातत्याने ऑफ स्टम्प लेंथ गोलंदाजी करून त्याने विराट कोहलीला पुन्हा तीच चूक करायला भाग पाडले. अन् विराट कोहलीनं ३ धावावर विकेट फेकली. याआधी पर्थ कसोटी सामन्यात हेजलवूडनं कोहलीला याच पॅटर्नमध्ये आउट केले होते. पिंक बॉल कसोटीतही विराटच्या बाबतीत तेच झालं अन् आता पुन्हा एकदा तो गरज नसताना ऑफ स्टंप बाहेरचा चेंडू खेळण्याच्या नादात आउट झाला.

पुन्हा पुन्हा एकच चूक! तीन सामन्यातील चौथ्या डावातही बाहेर जाणाऱ्या चेंडूनं केला घात 

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पर्थ कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जोश हेजलवूड याने सेम पॅटर्नमध्ये किंग कोहलीला बाद केले होते. यावेळी तो फक्त ५ धावा करून तंबूत परतला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात कोहलीनं नाबाद शतकी खेळी केली. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहली पुन्हा फ्लॉप ठरला.  पिंक बॉल टेस्टमध्ये त्याने अनुक्रमे ७ आणि ११ धावांवर विकेट फेकली होती. त्यावेळीही तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवरच फसला होता. पहिल्या तीन सामन्यातील चौथ्या डावात त्याच्यावर पुन्हा नामुष्की ओढावली आहे. 

हा नाद  लयच बाद  

विराट कोहली ज्या ज्या वेळी बॅड पॅचचा सामना करताना दिसला आहे त्या त्या वेळी तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवरच फसताना पाहायला मिळाले आहे. त्याची विकेट मिळवण्याच 'राज' आता प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कळलं आहे.  "मेरे इतने करीब मत आओ मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी" असं म्हणत येणाऱ्या डिलिव्हरीवर तो "मै बरबाद होना चाहता हूं" हेच गाणं म्हणताना दिसते. तो हा नाद सोडणार नाही तोपर्यंत तो यातून सावरणं कठीणच दिसते. 

 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया