कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) दोन वेळा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठक बोलावली आणि दोनही वेळेस निर्णय राखून ठेवला. 10 जूनला झालेल्या बैठकीत आयसीसीनं आणखी एक महिना परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करावी असा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13 व्या मोसमासाठीच्या हालचाली सुरू केल्या. (नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद)
आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी सप्टेंबर-नोव्हेंबर विंडोची चाचपणी बीसीसीआयनं सुरू केली आहे. गरज पडल्यास प्रेक्षकांशिवाय किंवा भारताबाहेर आयपीएल खेळवण्याचीही तयारी बीसीसीआयनं दर्शवली आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, बीसीसीआयच्या या तयारीला मोठा धक्का देणारी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी केली. त्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावलेली निर्बंध शिथिल करताना क्रीडा स्पर्धांनाही मान्यता दिली आहे. त्यात त्यांनी सामना पाहण्यासाठी 25% प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगीही दिल्याची घोषणा केली आहे.( BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित)
राष्ट्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर पंतप्रधान मॉरिसन यांनी क्रीडा स्पर्धा, कॉन्सर्ट आणि महोत्सवासारख्या कार्यक्रमात बदल लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या कार्यक्रमांत 25 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. उदाहरण.. 40000 प्रेक्षकक्षमता असलेल्या स्टेडियममध्ये आता 10 हजार प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. मॉरिसन यांच्या या घोषणेनं बीसीसीआयला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या या घोषणेनं आयसीसीच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप झाल्यास बीसीसीआयला आयपीएल खेळवण्याचे स्वप्न गुंडाऴावे लागेल आणि त्यांना 4000 कोटींचा फटका सहन करावा लागेल.
![]()
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिकेसाठी जाणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धा होईल. या स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियातच चार कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप झाल्यास यंदा आयपीएल होण्याची शक्यता मावळेल. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कोलबेक यांनी अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे विधान केले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!
भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप करणाऱ्या डॅरेन सॅमीची माघार; 'कालू'चा अर्थ उमगला
डेव्हिड वॉर्नर, अॅडम गिलख्रिस्ट यांनी मानले भारतीय विद्यार्थांचे आभार; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...
पाकिस्तानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना 'राजा'सारखी वागणूक देतो; वर्णद्वेषाच्या मुद्द्यात PSLमालकाची उडी