BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:55 PM2020-06-12T13:55:27+5:302020-06-12T13:56:29+5:30

whatsapp join usJoin us
Indian Cricket Team will not travel to Sri Lanka and Zimbabwe owing to the current threat of COVID-19 | BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के दिले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया मैदानावर कधी परतणार, याबाबतची सर्वांना उत्सुकता होती. श्रीलंका दौऱ्यावरून भारतीय संघाच्या मिशन क्रिकेटला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. पण, बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर जाणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. आता त्यात आणखी एका दौऱ्याची भर पडली आहे. भारतीय संघ आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावरही जाणार नसल्याची घोषणा बीसीसीआयनं केली.

नियोजित वेळापत्रकानुसार भारतीय संघ 24 जूनपासून  सुरु होणाऱ्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार होता आणि त्यानंतर 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार होता. पण, भारतातील कोरोना परिस्थिती पाहता अजूनही खेळाडूंच्या सरावाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे हा दौरा तुर्तास स्थगित करावा लागत आहे.   


दरम्यान, बीसीसीआयनं इंडियन प्रीमिअर लीगसाठ कंबर कसली आहे. सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप करणाऱ्या डॅरेन सॅमीची माघार; 'कालू'चा अर्थ उमगला 

 

डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी मानले भारतीय विद्यार्थांचे आभार; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

 

BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...

पाकिस्तानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना 'राजा'सारखी वागणूक देतो; वर्णद्वेषाच्या मुद्द्यात PSLमालकाची उडी

Web Title: Indian Cricket Team will not travel to Sri Lanka and Zimbabwe owing to the current threat of COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.