Australia T20 World Cup 2026 Squad Announced : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आशियाई मैदानातील परिस्थितीता विचार करता निवड समितीने यावेळी फिरकीपटूंवर अधिक विश्वास दाखवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल ओवेनचा पत्ता कट, कारण...
मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील संघातून हॉबर्ट हरिकेन्सचा ऑलराऊंडर मिचेल ओवेन याला वगळण्यात आलं असून, हा निर्णय सर्वाधिक धक्कादायक मानला जात आहे. ओवेनने मागील सहा महिन्यांत १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते, मात्र कॅमेरुन ग्रीन आणि अनुभवी मार्कस स्टॉयनिस यांच्या पुनरागमनामुळे त्याला वर्ल्ड कपसाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालेले नाही.
काव्या मारनने IPL लिलावात दिले १३ कोटी…आणि इंग्लंडने त्यालाच T20 वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं!
वेगवान गोलंदाजीत मोठा बदल
टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने जो संघ निवडला आहे त्यात एकही डावखुरा वेगवान गोलंदाजाचा समावेश नाही. मिचेल स्टार्कने आधीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्पेन्सर जॉन्सन पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. जलदगती गोलंदाजामध्ये झेवियर बार्टलेट याला संधी देण्यात आली आहे.
कूपर कोनोली याला सरप्राइज
कूपर कोनोली याची संघात पुन्हा निवड होणं अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे. मागील १२ टी-२० सामन्यात तो संघाबाहेर होता. मात्र उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. याशिवाय मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू कुह्नेमन आणि झेवियर बार्टलेट यांना टी-२० वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
या ३ अनफिट खेळाडूंवर खेळला डाव
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने दुखापतीतून अजूनही सावरत असलेल्या तिघांना संघात स्थान दिले आहे. कर्णधार पॅट कमिन्स यांच्या पाठीचा स्कॅन लवकरच होणार आहे. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि फलंदाज टिम डेविड दोघेही स्नायू दुखापतीतून पूर्णत: सावरलेले नाहीत. पण ते टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत फिट होतील, या आशेवर ऑस्ट्रेलियन संघाने त्यांना संघात स्थान दिले आहे. आयसीसीच्या नियमानुसार ३१ जानेवारीपर्यंत संघात बदल करता येऊ शकतो. त्यामुळे आयत्या वेळी मिचेल ओवेनसह बेन ड्वारशुइस, सीन अॅबॉट, अॅरॉन हार्डी, अॅलेक्स केरी आणि जोश फिलिप यांच्यासाठी अजूनही संघाचे दरवाजे उघडण्याची एक संधी निश्चितच आहे.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली,पॅट कमिन्स, टिम डेविड, कॅमरुन ग्रीन. नॅथन एलिस, जोश हेजलवूड, ट्रॅवस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू कुह्नेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा
ऑस्ट्रेलियाचे साखळी फेरीतील सामने
- ११ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड (कोलंबो)
- १३ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे (कोलंबो)
- १६ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (पल्लेकेले)
- २० फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान (पल्लेकेले)