Join us

ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत

Australia Fire : मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीननं सुरु केलेल्या या चळवळीत ग्लेन मॅक्सवेलसह अन्य अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:47 IST

Open in App

ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. वन्यप्राण्यांनाही आपले जीव गमवावे लागले. या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. शिवाय जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. या आगीत होरपळलेल्या जीवांना मदतीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसह अनेक टेनिसपटूही पुढे सरसावले आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या ख्रिस लीननं बिग बॅश लीगमधील सामन्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या पुढाकारात ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डी'आर्सी शॉर्ट हे खेळाडूही सहभागी झाले. एका खेळाडूनं तर एका सामन्यातून तब्बल 1750 डॉलर म्हणजेच सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा केला.

ऑस्ट्रेलियातील आगीत संसार उध्वस्त; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा मदतीचा हात

बिग बॅश लीगमधील प्रत्येक सामन्यातील एका षटकारासाठी 250 डॉलरची मदत करण्याचा उपक्रम सुरू केला. बिग बॅश लीगमध्ये लीन ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि पहिल्याच सामन्यात त्यानं तीन षटकार खेचून 750 डॉलरची मदत केली. पण, लीनला मागे टाकून एका खेळाडूनं तब्बल 1750 डॉलर एवढी रक्कम मदत म्हणून दिली. डी' आर्सी शॉर्ट असे या खेळाडूचे नाव आहे.  हॉबर्ट हरिकेन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शॉर्टनं रविवारी पर्थ स्कॉचर्स संघाविरुद्ध दमदार शतक झळकावले. बिग बॅश लीगमध्ये त्याचे हे दुसरे, तर यंदाच्या मोसमातील पहिलेच शतक ठरले.

अखेरचा चेंडू अन् शतकासाठी तीन धावांची गरज; जाणून घ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजानं काय केलं ख्रिस लीननं उभ्या केलेल्या चळवळीत शॉर्टचाही सहभाग आहे. त्यानुसार त्यानंही बिग बॅश लीगमध्ये प्रत्येक सामन्यातील षटकारातून 250 डॉलरची मदत करण्याचे जाहीर केले होते. रविवारी त्यानं 70 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 103 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याच्या 7 षटकारांनी ऑस्ट्रेलियातील भीषण आगीसाठी 1750 डॉलरचा निधी उभारला. भारतीय चलनानुसार ही रक्कम 1,26,097 इतकी होते.

टॅग्स :ऑस्ट्रेलिया भीषण आगग्लेन मॅक्सवेलआॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटमुंबई इंडियन्स