Join us

Aus vs Pak: पाक खेळाडूंचा ढिसाळ कारभार; वॉर्नर, मार्नसचा शतकी प्रहार

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटी ( दिवस रात्र) सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धू धू धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 17:20 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटी ( दिवस रात्र) सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धू धू धुलाई केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुश्चॅग्ने यांनी शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. जो बर्न्स ( 4) स्वस्तात माघारी परतल्यानंतर वॉर्नर आणि लॅबुस्चॅग्ने या जोडीनं ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 250+ धावांची भागीदारी केली. या सामन्यात पाकिस्ताच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि त्याचाच फायदा ऑसी फलंदाजांना झाला. ऑस्ट्रेलियानं 66 षटकांत 1 बाद 269 धावा केल्या होत्या.

पहिल्या कसोटीत पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं 296 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 154 धावा कुटल्या. मार्नस लॅबुश्चॅग्नेनं कसोटीतील पहिले शतक झळकावताना 185 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 580 धावांपर्यंत मजल मारून दिली. पाकिस्तानचा दुसरा डाव 335 धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. हेझलवूड ( 4/63), मिचेल स्टार्क ( 3/73) आणि पॅट कमिन्स ( 2/69) यांनी पाकचा धाव गुंडाळला. पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

दुसऱ्या कसोटीतही वॉर्नर आणि लॅबुश्चॅग्ने या जोडीनं पाकिस्तानच्या फलंदाजांवर प्रहार केला. वॉर्नर 206 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीनं 140 धावांवर खेळत आहे, तर लॅबुश्चॅग्ने 188 चेंडूंत 17 चौकारांसह 119 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचे हे पाचवे कसोटी शतक ठरले आणि सर्वात कमी डावांत म्हणजे 11 डावांमध्ये वॉर्नरनं ही कामगिरी केली. त्यानं राहुल द्रविडचा 17 डावांमध्ये 5 कसोटी शतकांचा विक्रम मोडला. 2012नंतर ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी कसोटीत सलग दोन शतक करण्याचा विक्रम केला. 2012मध्ये मायक्ले क्लार्क ( 259* व 230 ) आणि माइक हसी ( 100 व 103) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतकं झळकावली होती. 

गचाळ क्षेत्ररक्षण

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तानआयसीसीडेव्हिड वॉर्नर