Join us

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स

पहिल्या टी-२० सामन्यात पाक संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 19:14 IST

Open in App

Australia vs Pakistan, 1st T20I - 7 over game : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका जिंकत इतिहास रचणाऱ्या पाकिस्तान संघाला टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामना प्रत्येकी ७-७ षटकांचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ७ षटकात ४ बाद ९३ धावा करत पाकिस्तानी संघासमोर ९४ धावांचा लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघानं ७ षटकाच्या सामन्यात ६४ धावा करत ९ विकेट्स गमावल्या. संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.      

मॅक्सवेलसह स्टॉयनिसची फटकेबाजी

मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क या जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जेक फ्रेझर ५ चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला. मग मॅक्सवेल मैदानात उतरला. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यानं १९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय स्टॉयनिसनं ७ चेंडूत २१ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट ४चेंडूत ७ धावा करून चालता झाला. टिम डेविड याने ८ चेंडूत १० धावा काढल्या. मॅक्सवेल आणि स्टॉयनिसच्या फटकेबाजीच्या जोरावर  ऑस्ट्रेलियानं ७ ओव्हरच्या गेममध्ये  ४ विकेट्सच्या मोबदल्याच धावफलकावर ९३ धावा लावल्या होत्या. 

मॅच तर गेलीच पण ७ ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावल्यामुळे झाली  खरी फजिती

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची कामगिरी खूपच ढिसाळ झाली. कॅप्टन मोहम्मद रिझवानच्या पदरी पडलेला भोपळा आणि  बाबर आझमसह आघाडीच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हसीबुल्लाह खान १२ (८) अब्बास २० (१०) आणि शाहिन शाह आफ्रिदी ११ (६) या तळातील फलंदाजांनीच कसा बसा  दुहेरी आकडा गाठला. पण त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. ७ ओव्हरची मॅच गमावण्यापेक्षा या मॅचमध्ये ९ विकेट्स गमावून पाकिस्तानची फजिती झालीये. 

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटबाबर आजमग्लेन मॅक्सवेल